Children's Day 2022 : मुलांचा बालदिन स्पेशल साजरा करायचाय? मग 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या
Children's Day 2022 : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो.
![Children's Day 2022 : मुलांचा बालदिन स्पेशल साजरा करायचाय? मग 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या childrens day 2022 know here to visit on children's day with childrens marathi news Children's Day 2022 : मुलांचा बालदिन स्पेशल साजरा करायचाय? मग 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/12/e0f28b7fb7400ff79d68fe642956b1281668264030463358_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Children's Day 2022 : लहान मुले प्रत्येक सणासाठी खूप हौशी असतात. लहान मुलं जशी त्यांच्या वाढदिवसाची वाट पाहतात तशीच ते बालदिनाचीही तितक्याच आतुरतेने वाट पाहतात. दरवर्षी 14 नोव्हेंबर या दिवशी बालदिन (Children's Day 2022) साजरा करतात. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो.
बालदिनाच्या दिवशी भारतात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम राबविले जातात. तुम्हाला सुद्धा हा बालदिन तुमच्या मुलांसाठी स्पेशल बनवायचा आहे का? बालदिनी मुलांना फिरण्यासाठी काही खास ठिकाणं आहेत. तुम्ही मुलांना या ठिकाणी नक्की घेऊन जाऊ शकता आणि त्यांचा आनंद द्विगुणित करू शकता.
1. एडवेंचर आयर्लंड :
लहान मुलांना साहसी खेळ खेळायला खूप आवडतात. अशा वेळी पालक मुलांना अॅडव्हेंचर आयर्लंडचा फेरफटका मारण्यासाठी घेऊन जाऊ शकतात. हे ठिकाण देशभर प्रसिद्ध आहे. हे ठिकाण सकाळी अगदी 10 वाजल्यापासून सुरु असते. अर्थात, लहान मुलांच्या सुखासाठी तुम्हाला थोडे पैसे खर्च करावे लागतील. पण मुलांना त्यातून नक्कीच आनंद मिळेल.
2. वॉटर पार्क :
पाण्यात खेळायला कोणाला नाही आवडत. लहान मुलांना पाण्यात खेळायला खूप आवडते. त्यामुळे बालदिनाच्या दिवशी मुलांना एखाद्या छानशा रिसॉर्टला घेऊन जा. या ठिकाणी गेल्यावर अनेक मुलांच्या संपर्कात आल्यावर मुले लगेच अॅक्टिव्ह होतात.
3. 7 वंडर्स :
मुलांना मौजमजेबरोबरच ज्ञान देण्याचीही तितकीच जास्त गरज आहे. मुलांच्या जनरल नॉलेजमध्ये भर पाडायची असेल तर तुम्ही त्यांना मिनी 7 वंडर्स ला घेऊन जाऊ शकतात. या ठिकाणी जगातील 7 अद्भुत आश्चर्यांचं मिनी व्हर्जन आहे. या ठिकाणी गेल्यानंतर मुलांना अनेक गोष्टींची माहिती तर मिळेलच. पण, त्याचबरोबर त्यांना इतिहासाची तसेच नवीन गोष्टी पाहण्याची आवड निर्माण होईल. त्यामुळे हे ठिकाण नक्की चुकवू नका.
4. बीचची सफर :
तुमच्या मुलांबरोबर छानशी संध्याकाळ जर तुम्हाला घालवायची असेल तर तुम्ही बीचचा पर्याय नक्कीच निवडू शकता. या ठिकाणी गेल्यावर इथलं शांत वातावरण मुलांना नक्कीच आकर्षित करेल. त्याचबरोबर मुलांचं खेळणंदेखील होईल.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)