एक्स्प्लोर
Advertisement
सतत प्रवास केल्यास कॅन्सरचा धोका
सतत प्रवास करणाऱ्यांना कॅन्सरचा धोका जास्त असल्याचा दावा, संशोधकांनी केला आहे. ‘पीएलओएस बायोलॉजी’मध्ये यासंदर्भातील एक अहवाल प्रकाशित केला आहे.
लंडन : जर तुम्ही सतत प्रवास करत असाल, तर तुमच्यासाठी धोक्याची सुचना आहे. कारण, सतत प्रवास करणाऱ्यांना कॅन्सरचा धोका जास्त असल्याचा दावा, संशोधकांनी केला आहे. ‘पीएलओएस बायोलॉजी’मध्ये यासंदर्भातील एक अहवाल प्रकाशित केला आहे.
या अहवालात म्हटलं आहे की, "सततच्या प्रवासातून येणाऱ्या थकव्यामुळे कॅन्सरचा धोका सर्वाधिक प्रमाणात वाढतो. कारण, थकव्यामुळे ‘बॉडी क्लॉक’वर परिणाम होतो. यातून कॅन्सर होण्याचा धोका बळावतो.
तसेच, सततच्या प्रवासामुळे कॅन्सरचा प्रतिकार करणाऱ्या पेशी तयार होण्याच्या प्रमाणातही मोठी घट होते.” असंही अहवालात म्हटलं आहे.
संशोधकांनी यासंदर्भात बर्लिनच्या चॅरिटी मेडिकल यूनिव्हर्सिटीचे मुख्य लेखक एंजेला रीलोगियांचा दाखला दिला आहे. रीलोगियांच्या मते, “शरीराचं ‘बॉडी क्लॉक’ हे रोजच्या दिनचर्येवर तयार होतं. आणि हेच ‘बॉडी क्लॉक’ ट्यूमरवर नियंत्रक म्हणून काम करतं.”
या टीमने ‘आरएएस’ नावाचे एक प्रोटीनचंही विश्लेषण केलं आहे. हे प्रोटीन उंदरांमधील कॅन्सर होऊ शकणाऱ्या पेशींमध्ये एक चतुर्थांश प्रमाणात सक्रिय असतात. आरएएस प्रोटीन शरीरातल्या पेशींमध्ये कॅन्सरच्या वाढल्यास त्याचा प्रतिकार करतात.
याशिवाय, संशोधकांनी दोन प्रकारचे प्रोटीनही दिले आहेत. यातील एक म्हणजे, आयएनके 4 आणि दुसरं म्हणजे एआरएफ. हे दोन्ही प्रोटीन्स कॅन्सरला दाबण्याचं काम करतात.
दरम्यान, यासंदर्भातीलच आणखी एक रिसर्च अहवाल प्रसिद्ध झाला होता. यात पेशींचं प्रमाण कमी-जास्त होण्यावरुन व्यक्तीचं आयुष्यमान ठरतं. आणि त्यातून कॅन्सरला जोडलं जाऊ शकतं.
‘बॉडी क्लॉक’मधील बदलामुळे हृदयाचे आजार आणि मधुमेहाच्या प्रमाणात वाढीसाठी कारणीभूत ठरतं.
नोट : हा रिसर्च तज्ज्ञांच्या दाव्यांवर आवलंबून आहे. एबीपी माझाने याची पुष्टी केलेली नाही. तुम्ही या संदर्भात तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement