Brother's Day 2022 : भावाविषयी आपलं प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे 'ब्रदर्स डे'; जाणून घ्या याचा इतिहास आणि महत्त्व
Brother's Day 2022 : लहानपणापासून ते मोठं होईपर्यंत ज्याच्याशी आपण आपल्या सगळ्या गोष्टी शेअर करतो तो म्हणजे भाऊ. याच भावासाठी दरवर्षी 24 मे हा 'Brother's Day' साजरा केला जातो.
Brother's Day 2022 : दरवर्षीप्रमाणे आपण ज्या प्रमाणे मदर्स डे, फादर्स डे, सिबलिंग डे साजरा करतो. त्याचप्रमाणे ब्रदर्स डे सुद्धा साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक भावासाठी खास असतो. दरवर्षी 24 मे हा Brother's Day साजरा केला जातो. नावाप्रमाणेच, हा दिवस भावांबद्दल प्रेम आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. लहानपणापासून ते मोठं होईपर्यंत ज्याच्याशी आपण आपल्या सगळ्या गोष्टी शेअर करतो तो म्हणजे भाऊ. एकत्र खाण्याच्या, खेळण्याच्या, मौजमजा करण्याच्या अशा अनेक आठवणी भावाशी जोडलेल्या असतात.
खरंतर आपण आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी ज्याच्याबरोबर शेअर करू शकतो असा एक तरी भाऊ प्रत्येकाच्या आयुष्यात असावा. भावासोबतचे तेच क्षण आठवण्याचा आणि भावाला स्पेशल फील करून देण्याचा हा दिवस आहे. या निमित्ताने जाणून घ्या ब्रदर्स डे चा इतिहास.
ब्रदर्स डेचा इतिहास (Brother's Day History 2022) :
जरी ब्रदर्स डेची सुरुवात कशी झाली याबद्दल पुरेशी माहिती जरी नसली तरी, असे म्हटले जाते की हा दिवस पहिल्यांदा 2005 मध्ये अलाबामा, यूएसए येथील डॅनियल रोड्स यांनी साजरा केला होता. जो व्यवसायाने कलाकार आणि लेखक होता. ब्रदर्स डेच्या सुरुवातीचे श्रेय त्यांना जाते. हळुहळू या दिवसाला लोकांची पसंती मिळाली आणि तेव्हापासून दरवर्षी 24 मे हा दिवस ब्रदर्स डे म्हणून साजरा केला जाऊ लागला.
ब्रदर्स डेचे महत्त्व (Brother's Day Importance 2022) :
ब्रदर्स डे चे महत्व म्हणजे हा दिवस खास भावासाठी असतो. भावाबद्दल आपल्या भावना, प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. या दिवशी भावाला मिठी मारून शुभेच्छा दिल्या जातात. तसेच, भावासाठी खास भेटवस्तूही दिल्या जातात. आज ब्रदर्स डेची लोकप्रियता अमेरिकेपासून फ्रान्स, जर्मनी, भारत, चीन आणि रशियासारख्या इतर देशांमध्ये चांगली दिसते. या सर्व देशांमध्ये, 24 मे रोजी लोक आपल्या भावाबरोबर हा दिन साजरा करतात.
वास्तविक, खऱ्या भावांव्यतिरिक्त, इतर लोक, जसे चुलत भाऊ आणि मित्र सुद्धा आपल्या आयुष्यात भावाची उणीव भरून काढू शकतात आणि ते नेहमी भावांसारखे आपल्यासाठी उभे असतात. खरे तर प्रत्येक माणसाच्या आयुष्यात किमान एक तरी भाऊ असला पाहिजे, ज्याच्याकडून तो प्रामाणिक सल्ला घेऊ शकेल, आपले मन बोलू शकेल, त्याच्यासोबत मजा करू शकेल. तो भाऊ, मित्र, नातेवाईक किंवा तुमच्यासाठी खास कोणीही असू शकतो.
महत्वाच्या बातम्या :