एक्स्प्लोर

Break the silence: आता गर्भपातावर चर्चा होणार, क्वेस्ट ग्लोबलचा स्तुत्य उपक्रम; धक्कादायक अहवालातून जागरुकता निर्माण करण्याचे प्रयत्न

Quest Global Launches Break the Silence campaign: गर्भपाताच्या समस्येमुळे भारतातील 70 दशलक्ष नोकरदार महिला नोकरी सोडण्याच्या विचारात तर 78 दशलक्ष महिलांना नोकरी जाण्याची भीती : क्वेस्ट ग्लोबलचा अहवाल

Break the Silence Campaign: भारतात दरवर्षी लाखो महिलांना गर्भपाताचा त्रास सहन करावा लागतो. तर नोकरी करत असतानाच अनेकींना हा त्रास होतो. तरीही, बहुतांश महिलांच्या गर्भपाताकडे कामाच्या ठिकाणी दुर्लक्ष केले जाते. अनेकदा हा त्रास मुकाट्याने सहन केला जातो. त्यातही लोकांच्या टीकेचा विषय होऊ नये किंवा करिअरवर होणाऱ्या परिणामाची भीती सोबत असते. जगातील सर्वात मोठ्या स्वतंत्र केवळ अभियांत्रिकी सेवा पुरवणाऱ्या क्वेस्ट ग्लोबल या कंपनीने, 'ब्रेक द सायलेन्स' ही अशा प्रकारची पहिलीच राष्ट्रीय मोहीम आज सुरू केली आहे. कामाच्या ठिकाणी गर्भपाताच्या विषयावर चर्चा घडवून आणण्यावर ही मोहीम लक्ष केंद्रित करते. 

क्वेस्ट ग्लोबलने YouGovच्या सहकार्याने केलेल्या मूळ संशोधनावर ही मोहीम आधारित आहे. गर्भपात ही कर्मचाऱ्यांची एक गंभीर समस्या म्हणून समोर येते. कारण, याचे उत्पादकता, कर्मचारी टिकवून ठेवणे, समावेशकता आणि दीर्घकालीन करिअर प्रगतीवर जाणवण्याजोगे परिणाम होतात. देशभरातील 25 ते 39 वयोगटातील 2000 महिला आणि 200 पुरुषांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. यात स्टेम, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील कनिष्ठ, मध्यम, वरिष्ठ व्यवस्थापन स्तरावरील कर्मचाऱ्यांचा, तसेच विविध टीम्सचे नेतृत्व करणाऱ्या पुरुष व्यवस्थापकांचा समावेश होता.

गर्भपातावर क्वेस्ट ग्लोबलचा धक्कादायक अहवाल (Quest Global Launches Break the Silence)

अभ्यासात असे दिसून आले की, बहुतांश महिला मूकपणे हा त्रास सहन करत राहतात; पण हे त्या स्वतःच्या इच्छेने करत नाहीत तर भीतीपोटी करतात. गर्भपात झाल्याचे सांगितल्यास नोकरी जाण्याची किंवा करिअरवर विपरीत परिणाम होण्याची भीती सुमारे 7.8 कोटी महिलांना वाटते, तर 8 कोटी महिला इतरांच्या नकारात्मक प्रतिक्रियेच्या किंवा टीकेच्या भीतीमुळे गप्प राहतात. याव्यतिरिक्त, गर्भपातानंतर मालकांकडून योग्य आधार न मिळाल्यास 7 कोटी भारतीय महिला आपली नोकरी सोडण्याचा विचार करू शकतात. दर 4 पैकी 3 महिलांनी असे म्हटले की, गर्भपातामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो, शिवाय गप्प राहिल्यामुळे त्यांच्या कामावरही परिणाम होतो.

या उपक्रमाच्या शुभारंभावेळी क्वेस्ट ग्लोबलचे सह-संस्थापक आणि सीईओ, अजित प्रभू म्हणाले, “बऱ्याच काळापासून गर्भपात ही बाब कामाच्या ठिकाणी दुर्लक्षित राहिली आहे, ज्यामुळे अनेक महिलांना आपले काम सुरू ठेवत हे दुःख सहन करावे लागते. आमच्या संशोधनानुसार, या मौनामुळे उत्पादकता, आत्मविश्वास, नोकरी टिकवून ठेवणे आणि करिअर यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. हा केवळ आरोग्याचा प्रश्न नाही; तर हा कर्मचारी वर्गाचाही प्रश्न आहे. भारतातील सर्व सीईओ आणि व्यावसायिक नेत्यांना मी आवाहन करतो की, त्यांनी गर्भपाताला कामाच्या ठिकाणावरील वास्तव म्हणून स्वीकारण्यासाठी आमच्यासोबत यावे. चला, अशी कार्यस्थळे निर्माण करूया, जिथे प्रत्येकाला सुरक्षित, आधार मिळेल आणि सक्षम वाटेल.”

क्वेस्ट ग्लोबलने YourDOST सोबत भागीदारी करून एक संपूर्ण सहाय्यक व्यवस्था सुरू केली आहे, ज्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे: 

गर्भपाताच्या समस्येमध्ये विशेष प्रशिक्षित मानसशास्त्रज्ञांद्वारे गोपनीय आणि तज्ज्ञ साहाय्य देण्यासाठी 24तासांची हेल्पलाइन, समवयस्कांसाठी सहाय्य गट, एचआर व्यावसायिक आणि व्यवस्थापकांना संवेदनशील विषय हाताळण्यासाठी प्रशिक्षण साहित्य, जागरूकता निर्माण करणारे वेबिनार आणि डाउनलोड करण्यायोग्य कार्यस्थळ साधने. याचा प्रभाव वाढवण्यासाठी, YourDOSTच्या या गर्भपात सहाय्य सेवा क्वेस्ट ग्लोबल भारतातील प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक संस्थेपर्यंत विनामूल्य पोहोचवत आहे. या साधनांची उपलब्धता वाढवल्यामुळे, लोकांना आणि संस्थांना एक नियोजनबद्ध आणि सहज उपलब्ध होणारे मदत मिळेल.

ही कृती करण्यामागील व्यावसायिक औचित्य स्पष्ट आहे. जेव्हा मालक खऱ्या अर्थाने आधार देणारे वातावरण निर्माण करतात, तेव्हा 48% महिलांना आपले म्हणणे मोकळेपणाने मांडता येते; तसेच, गर्भपातासारख्या कठीण प्रसंगी आधार देणाऱ्या मालकाबद्दल 43% महिलांच्या मनात आदर निर्माण होते. कर्मचाऱ्यांना टिकवून ठेवणे, सर्वसमावेशकता साधणे आणि सक्षम मनुष्यबळ (टॅलेंट पाइपलाइन) टिकवून ते बळकट करणे यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या संस्थांसाठी, 'मौन तोडण्याचा' (Break the Silence) संकल्प करणे ही केवळ एक घोषणा नसून, एक धोरणात्मक व्यावसायिक निर्णयही ठरतो. किंबहुना, गर्भपाताच्या काळात आधार देणारी कंपनी हे 45% महिलांसाठी इतरांना आपल्या मालकाची शिफारस करण्याचे एक महत्त्वाचे कारण ठरू शकते.

"प्रत्येक आकडेवारीमागे एखादी स्त्री असते, जी एखादे अदृश्य ओझे पेलत असतानाही जिद्दीने पुढे जाण्याचा प्रयत्न करत असते. अशावेळी मिळणारा आधार ही काही साधी गोष्ट नाही; तो आधार तिला त्या संस्थेचा एक भाग वाटण्यास, तिथे टिकून राहण्यास आणि करिअरमध्ये प्रगती करण्यास मदत करू शकतो. जर अधिक स्त्रियांनी नोकरीत टिकून राहावे आणि नेतृत्वाची धुरा सांभाळावी असे आपल्याला वाटत असेल, तर स्त्रियांना सर्वाधिक एकटेपणा वाटणाऱ्या प्रसंगांकडे आपल्याला लक्ष द्यावे लागेल. गर्भपात हा असाच एक कठीण प्रसंग आहे आणि अशावेळी कामाच्या ठिकाणाहून मिळणारा आधार खूप मोठा फरक घडवून आणू शकतो," असे प्रतिपादन 'क्वेस्ट ग्लोबल'च्या चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर युमी क्लेव्हेंजर-ली यांनी केले.

"स्त्रिया हे दुःख एकट्याने पेलतात, त्या स्थितीतही आपले काम करत राहतात आणि क्वचितच मदत मागतात; कारण तसे केल्यास त्यांना व्यावसायिक पातळीवर त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते. केवळ एखाद्या धोरणामुळे यात बदल होत नाही. खरा बदल तेव्हाच घडतो जेव्हा कामाच्या ठिकाणी मौन बाळगण्याची गरज वाटत नाही," असे क्वेस्ट ग्लोबलच्या 'पीपल अँड कल्चर' विभागाच्या वरिष्ठ उपाध्यक्ष सोनिया कुट्टी म्हणाल्या.

काही समस्या अशा असतात ज्यांचे स्वरूप एखादी व्यक्ती किंवा संस्था एकटी हाताळू शकत नाही. म्हणूनच, या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आम्ही इतर कंपन्यांनाही सोबत घेत आहोत. गर्भपाताची दुर्घटना कोणत्याही क्षेत्रावर, कार्यालयावर किंवा टीमवर परिणाम करून जाते. जसजशा अधिक संस्था याची दखल घेतील, तसतसे 'ब्रेक द सायलेन्स' हा केवळ एक उपक्रम न राहता एक लोक चळवळ बनू लागेल. जितक्या जास्त कंपन्या यात सामील होतील, तितका हा पाठिंबा अधिक बळकट होईल आणि आम्हाला विश्वास आहे की, यामुळे संपूर्ण भारतात एक सकारात्मक बदल घडून येऊ शकेल.

आज आम्ही या उपक्रमाची सुरुवात केली आहे आणि पाच संस्था आधीच या चळवळीत सहभागी झाल्या आहेत: भारत सीरम अँड व्हॅक्सिन्स, कोने (Kone), अमरा राजा, स्टरलाइट टेक्नॉलॉजीज आणि इंडियन फार्मास्युटिकल अलायन्स. आम्ही सर्वजण मिळून गर्भपाताशी संबंधित विषयावरील मौन तोडत आहोत आणि अधिक समजून घेणारी तसेच आधार देणारी कार्यस्थळे निर्माण करत आहोत.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'देऊळ बंद 2'ची दिग्गजांच्या सिनेमांना दमदार टक्कर; 22व्या दिवशीही धुवांधार कमाई, कमाईचा आकडा ऐकाल तर...

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

National Epilepsy Day 2026: अपस्मार...फिट्सबद्दलचे गैरसमज आजच दूर करा! 'असे' 4 गैरसमज आणि सत्य प्रत्येकाने जाणून घ्यायला हवेत, तज्ज्ञ सांगतात...
अपस्मार...फिट्सबद्दलचे गैरसमज आजच दूर करा! 'असे' 4 गैरसमज आणि सत्य प्रत्येकाने जाणून घ्यायला हवेत, तज्ज्ञ सांगतात...
Health: बाळासाठी प्रयत्न करताय? मग रक्तातील साखरेची पातळी तपासली का? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती...
बाळासाठी प्रयत्न करताय? मग रक्तातील साखरेची पातळी तपासली का? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती...
Chatt Puja 2026: छटपूजा म्हणजे नेमकं काय? 4 दिवसांची खास परंपरा काय आहे? सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचं धार्मिक महत्त्व जाणून घ्या..
छटपूजा म्हणजे नेमकं काय? 4 दिवसांची खास परंपरा काय आहे? सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचं धार्मिक महत्त्व जाणून घ्या..
Happy Children’s Day 2026: बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! प्रियजनांना पाठवा सुंदर, हटके 'हे' शुभेच्छा संदेश, चेहऱ्यावर फुलवा हास्य ...
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! प्रियजनांना पाठवा सुंदर, हटके 'हे' शुभेच्छा संदेश, चेहऱ्यावर फुलवा हास्य ...

व्हिडीओ

Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report
Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut and Devendra Fadnavis : पुढचा बॉम्ब पडल्यावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील, मुंबईतील एसआरए घोटाळ्यावरुन संजय राऊतांचा खळबळजनक दावा, नेमकं काय म्हणाले?
पुढचा बॉम्ब पडल्यावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील, मुंबईतील एसआरए घोटाळ्यावरुन संजय राऊतांचा खळबळजनक दावा, नेमकं काय म्हणाले?
Lateef Bhat Indian Army : कुलगामच्या मास्टरमाइंडला कंठस्नान, लश्कर कमांडर लतीफ भट्ट चकमकीत ठार; कुलगाममध्ये भारतीय सैन्याची मोठी कारवाई
कुलगामच्या मास्टरमाइंडला कंठस्नान, लश्कर कमांडर लतीफ भट्ट चकमकीत ठार; कुलगाममध्ये भारतीय सैन्याची मोठी कारवाई
Thane Crime: वेळ 4 वाजून 46 मिनिटे; अचानक एकापाठोपाठ एक 20 अश्लील व्हिडीओ ‘स्टेटस’वर अपलोड; ठाण्याच्या पोलीस आयुक्तांचंच व्हॉट्सॲप ‘हॅक’,यंत्रणांची धावपळ, नेमकं काय घडलं?
वेळ 4 वाजून 46 मिनिटे; अचानक एकापाठोपाठ एक 20 अश्लील व्हिडीओ ‘स्टेटस’वर अपलोड; ठाण्याच्या पोलीस आयुक्तांचंच व्हॉट्सॲप ‘हॅक’,यंत्रणांची धावपळ, नेमकं काय घडलं?
Satara District Bank : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; भाजप की राष्ट्रवादी, कुणाचं पारडं जड? जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी महायुतीत रस्सीखेच; अध्यक्षपदावरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; भाजप की राष्ट्रवादी, कुणाचं पारडं जड? जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी महायुतीत रस्सीखेच; अध्यक्षपदावरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने
Satara District bank Chairman Election 2026: सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला धक्का, शिवसेना-राष्ट्रवादीने वचपा काढला, उदयसिंह पाटील उंडाळकरांची अध्यक्षपदी निवड
सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला धक्का, शिवसेना-राष्ट्रवादीने वचपा काढला, उदयसिंह पाटील उंडाळकरांची अध्यक्षपदी निवड
Raigad Traffic jam News : रायगडमध्ये चिमुकल्याने फुगा गिळला, घाबरलेले आई-बाप लेकराला रुग्णालयात घेऊन निघाले, पण ट्रॅफिकमुळे रस्त्यातच जीव सोडला, अलिबाग-बेलकडे मार्गावरील घटनेने संतापाची लाट
रायगडमध्ये चिमुकल्याने फुगा गिळला, घाबरलेले आई-बाप लेकराला रुग्णालयात घेऊन निघाले, पण ट्रॅफिकमुळे रस्त्यातच जीव सोडला, अलिबाग-बेलकडे मार्गावरील घटनेने संतापाची लाट
NCP Leader viral video: नर्तिकेवर एकापाठोपाठ एक कोऱ्या करकरीत नोटा उधळल्या, गर्दीतून 'सातबारा कोरा होईल'ची हाक, राष्ट्रवादीच्या नेत्याचा व्हिडीओ व्हायरल
नर्तिकेवर एकापाठोपाठ एक कोऱ्या करकरीत नोटा उधळल्या, गर्दीतून 'सातबारा कोरा होईल'ची हाक, राष्ट्रवादीच्या नेत्याचा व्हिडीओ व्हायरल
MS Dhoni Emotional Video After Retirement Of IPL: IPL मधून निवृत्ती घेताच जुन्या फोटोंसह स्वत: व्हिडीओ एडिट केला; MS धोनीच्या पोस्टने सगळ्यांना रडवले
IPL मधून निवृत्ती घेताच जुन्या फोटोंसह स्वत: व्हिडीओ एडिट केला; MS धोनीच्या पोस्टने सगळ्यांना रडवले
Embed widget