एक्स्प्लोर

Bhagat Singh Jayanti: आयुष्य स्वत:च्या हिमतीवर जगा..भगत सिंहांचे 'हे' विचार वाचून नसा-नसात भिणेल देशभक्ती! शूर सुपुत्राला जयंतीनिमित्त सलाम..

Bhagat Singh Birth Anniversary: भारताच्या इतिहासात भगत सिंह यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिलेले आहे. या शूर सुपुत्राने प्रज्वलित केलेली स्वातंत्र्याची ज्योत आजही लोकांच्या हृदयात तेवत आहे.

Bhagat Singh Birth Anniversary : भारताच्या इतिहासात भगत सिंह यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिलेले आहे. देशाच्या या शूर सुपुत्राने प्रज्वलित केलेली स्वातंत्र्याची ज्योत आजही त्यांच्या विचारातून लोकांच्या हृदयात तेवत आहे. भगत सिंह यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी झाला. या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला त्यांच्या अशाच काही अनमोल विचारांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचा ऊर अभिमान आणि देशभक्तीने भरून येईल

''देखना है जोर कितना बाजु-ए-कातिल में है''

''सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजु-ए-कातिल में है'' स्वातंत्र्याच्या 77 वर्षांनंतरही भगत सिंह यांचा हा नारा नसा-नसात देशभक्ती आणि उत्साह भरतो. भारताच्या महान इतिहासात अनेक शूर सुपुत्रांची नावे नोंदलेली आहेत, त्यापैकी एक भगत सिंह आजही लोकांच्या मनात आहेत. 28 सप्टेंबर 1907 रोजी जन्मलेल्या भगत सिंह यांनी देशाप्रतीच्या प्रेमासाठी आजही देशाच्या स्वातंत्र्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. वयाच्या 24 व्या वर्षी हौतात्म्य पत्करले.

एका वीरपुत्रामुळे ब्रिटीश सरकारची पाळेमुळे हादरली..

आपल्या शौर्याने आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठीच्या तळमळीने भगत सिंह यांनी ब्रिटीश सरकारची पाळेमुळे हादरवली. भारतासाठी बलिदान देणाऱ्या भगत सिंह यांना 1931 मध्ये फाशी देण्यात आली, परंतु त्यांचे हौतात्म्य व्यर्थ गेले नाही आणि त्यांनी पेटवलेली स्वातंत्र्याची ठिणगी संपूर्ण ब्रिटिश राजवटीला जाळून टाकणारी आग बनली. त्यांचे विचार आजही लोकांच्या मनात उत्साह भरतात. भगत सिंह यांच्या जयंतीनिमित्त, त्यांचे अनमोल विचार जाणून घ्या.. जे तुम्हाला उत्साहाने आणि उर्जेने भरतील.

भगत सिंह यांचे अनमोल विचार

  • जर क्रांतीचा आवाज ऐकवायचा असेल तर आवाज मोठा असायला हवा. जर आम्ही बॉम्ब फेकला तर त्याचा अर्थ कोणाला मारणे हा नाही. आम्ही ब्रिटीश राजवटीवर बॉम्ब फेकला असा आहे.

  • मी या विचारांवर ठाम आहे की, मी महत्त्वाकांक्षी, जिद्दी आणि जीवनावर प्रेम करण्याच्या भावनेने भारलेला आहे. पण, गरज पडल्यास मी या सर्वांचा त्यागही करु शकतो. हेच मोठे बलीदान आहे.

  • व्यक्तिला मारुन, अथवा दाबून ठेऊन तुम्ही त्याचे विचार मारु शकत नाही.

  • आयुष्य हे स्वत:च्या हिमतीवर जगायचे असते. दुसऱ्यांच्या खांद्याचा सहारा घेऊन तर अंत्ययात्रा जाते.

  • समाजात आजही असे लोक आहेत. जे बदलाच्या विचारानेच थरथरायला लागतात. आपल्याला निष्क्रियतेच्या भावनेला क्रांतिकारी भावनेत बदलावे लागेल.

  • निखाऱ्यांपेक्षाही माझ्या रक्ताची गर्मी अधिक आहे. मी एक असा वेडा आहे, जो तुरुंगातही स्वतंत्र आहे.

  • वेडा प्रेमी आणि कवी एकाच थाळीत तयार झालेले असतात आणि देशभक्तांना बहुतेक लोक वेडा बोलतात.

  • क्रांती शब्दाची व्याख्या शब्दामध्ये करण्यात अर्थ नाही. जे लोक या शब्दाचा वापर दुरुपयोगासाठी करतात त्यांचे फायदे, बोलणे आणि अर्थ वेगळे असतात.

  • क्रांती मानव जातीचा एक अपिहार्य अधिकार आहे. स्वातंत्र्यता हा एक कधीही न संपणारा जन्मसिद्ध हक्क आहे.

  • कडवा टीकाकार आणि स्वतंत्र विचार हे दोन्ही क्रांतिकारी विचारांची लक्षणे आहेत

  • भगत सिंह म्हणतात की, वाईट लोक वाढले म्हणून वाईटपणा वाढत नाहीये तर चुकीचं सहन करणारे लोक वाढले आहेत. 

  • माझ्या लेखणीला माझ्या भावनांची इतकी जाणीव आहे की, मला प्रेम लिहायचे असले तरी इन्कलाब लिहिलं जातं. आपलं आयुष्य आपल्या दमाने चालतं पण अंतिम प्रवास इतरांच्या खांद्यावर पूर्ण होतो.

  •  जो माणूस प्रगतीच्या मार्गात आडकाठी उभा राहतो, त्याला टीका आणि विरोध आणि पारंपरिक प्रवृत्तीला आव्हान द्यावे लागेल, तरच प्रगती शक्य आहे.
     
  • वेडा, प्रियकर आणि कवी हे एकाच थाळीचे तुकडे आहेत, म्हणजेच सर्व समान आहेत.
     
  • महत्वाकांक्षा, आशावाद, जीवनाचा उत्साह आणि गरजेनुसार या सर्वांचा त्याग करणे हाच खरा त्याग असेल.
     
  • अहिंसेला आत्मविश्वासाची ताकद असते आणि विजयाच्या आशेने दुःख सहन केले जाते, 
    परंतु जर प्रयत्न अयशस्वी झाले, तर आपल्याला आपल्या आत्मशक्तीला शारीरिक शक्तीची जोड द्यावी लागेल, तरच जुलमी शत्रुवर मात करू शकतो.
     
  • भगतसिंग म्हणतात की मी एक माणूस आहे आणि जे काही मानवतेला प्रभावित करते, मला त्याने फरक पडतो.
     
  • कोणताही जुलमी सामान्य लोकांना चिरडून त्यांचे विचार मारू शकत नाही.
     
  • भगत सिंह यांच्या मते, कायद्याचे पावित्र्य तोपर्यंतच राखले जाऊ शकते, जोपर्यंत ते लोकांची इच्छा व्यक्त करते.
     
  • क्रांती आणि स्वातंत्र्य हा माणसाचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि श्रम हा समाजाचा खरा भार आहे.
     
  • सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली तर कुणालाही खाजगी मालमत्ता मिळणार नाही.
     
  • गरीब असणे हे जगातील सर्वात मोठे पाप आहे का? गरिबी हा शाप आणि दंड आहे.
     
  • जर धर्म वेगळे केले तर आपण सर्वजण राजकारणावर एकत्र येऊ शकतो, जरी आपण धर्मात वेगळे राहिलो तरी.
     
  • जिवंत राहण्याची इच्छा स्वाभाविकपणे माझ्यातही असली पाहिजे. पण माझे जगणे एका अटीवर आहे, मला कैदेत किंवा तुरुंगात जगायचे नाही.
     
  • कठोरपणा आणि मुक्त विचार हे क्रांतिकारक असण्याचे दोन मोठे गुण आहेत.
     
  • कर्म आणि परिश्रम करणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे, कारण यश हे वातावरण आणि प्रसंगावर अवलंबून असते.
     
हेही वाचा>>>

Motivational : लाजायचं कशाला, बिनधास्त मत मांडा! आपलं मत मांडायला तुम्हालाही संकोच वाटतो? या टिप्सची मदत घ्या

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 14 January 2025Top 25 | टॉप 25 बातम्यांच्या सुपरफास्ट आढावा सुपरफास्टWalmik Karad Mother : रॉकेलचा डबा आणा, अंगावर टाकून फुकून द्या! कराडच्या आईची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 04PM TOP Headlines 04PM 14 January 2025 दुपारी 4 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget