Health Tips : रोज एक फळ खाण्याची सवय लावा; शरीराला मिळतील 'हे' आश्चर्यकारक फायदे
Health Tips : प्रत्येकजण तुम्हाला रोज काही ना काही फळ खाण्यास सांगतो. पण तुम्हाला माहीत आहे का फळे खाल्ल्याने काय फायदा होतो? याचं उत्तर जाणून घेऊयात.
Health Tips : बऱ्याच काळापासून असे म्हटले जाते की ताजी फळे खाण्याचे फायदे खूप आहेत. यामुळेच सर्वांनी ही वस्तुस्थिती स्वीकारून आपल्या आहारात फळांचा समावेश केला आहे. फळाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यात अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे आणि आहारातील फायबरसारखे पोषक घटक आढळतात. यामुळे आपले शरीर मजबूत होते.
फळे शरीराला चांगल्या प्रकारे कार्य करण्यास मदत करण्यासाठी विविध प्रकारचे पोषक प्रदान करतात. फळांमुळेच शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि आपल्या पेशींना दुरुस्तीची संधी मिळते. जरी असे खूप कमी लोक असतील ज्यांनी दररोज एक फळ खाण्याचा विचार केला असेल. चला जाणून घेऊया रोज एक फळ खाणे आरोग्यासाठी का महत्त्वाचे आहे?
रक्तातील साखरेचे नियंत्रण: सर्व फळांमध्ये नैसर्गिकरित्या साखर असते. त्यात फायबर आणि पोषक घटक देखील असतात. त्यांच्यामुळे रक्तप्रवाहात साखर शोषून घेण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढत नाही.
मानसिक आरोग्य: फळांमध्ये नैसर्गिकरीत्या काही पोषक घटक असतात, ज्यामुळे आपले मानसिक आरोग्य चांगले राहते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे जामुन, जे मानसिक आरोग्य सुधारणारे फळ म्हणून ओळखले जाते.
वजन नियंत्रणात ठेवा: फळांची एक चांगली गोष्ट म्हणजे त्यामध्ये कॅलरीज कमी असतात. त्यात फॅटचे प्रमाणही कमी आढळते, तर फायबर आणि पाण्याचे प्रमाण अधिक असते. यामुळेच आहारात फळांचा समावेश केल्यास वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
अँटिऑक्सिडंट्स : फळांमध्ये अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे, तुमच्या पेशींना ऑक्सिडेटिव्ह तणावामुळे होणारे नुकसान टाळण्याची संधी मिळते. अँटिऑक्सिडंट्स हृदयविकाराचा झटका, कर्करोग आणि न्यूरोडीजनरेटिव्ह विकारांचा धोका देखील कमी करतात.
पचन सुधारते: फळे नैसर्गिक एन्झाईम्सने भरलेली असतात. यामुळे तुमची पचनक्रिया चांगली होते. उदाहरणार्थ, अननसातील ब्रोमेलेन आणि पपईतील पपेन हे पचनासाठी चांगले असतात. हे एन्झाइम प्रथिने तोडण्यास मदत करतात.
फळांमध्ये नैसर्गिकरीत्या काही पोषक घटक असतात, ज्यामुळे आपले मानसिक आरोग्य चांगले राहते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे जामुन, जे मानसिक आरोग्य सुधारणारे फळ म्हणून ओळखले जाते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :