(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Salman Sperm Facial: हॉलिवूडच्या या अभिनेत्रीनं केलेल्या ब्यूटी ट्रेंडची जोरदार चर्चा, अँन्टी एजींगसाठी खरंच फायद्याचंय का हे फेशिअल?
सॅल्मन फिश फेशियल या ट्रीटमेंटचा ॲन्टी एजींग आणि हायड्रेशनसाठी वापर केल्याचं कबूल केल्यानंतर हा ब्यूटी ट्रेंड आता चांगलाच गाजतोय.
Salman Sperm Facial: आपली त्वचा सुंदर आणि तजेलदार रहावी यासाठी अनेकजण नानाविध प्रकार करताना दिसतात. सोशल मिडीयावर मध्यंतरी बर्फाच्या पाण्यात चेहरा बुडवण्याचा ट्रेंड सुरु होता. आलिया भट्टसह अनेक अभिनेत्रींनी पोस्ट केलेल्या ब्युटी ट्रेंडनंतर अनेकांनी आपले चेहरे बर्फाच्या पाण्यात बुडवले. सोशल मिडीयावर कोणी कुठला मास्क, सिरम, फेशल ब्यूटी प्रोडक्ट वापरतं याकडे समस्त तरुणींसह महिलामंडळाचं लक्ष असतं. आपल्या त्वचेची काळजी म्हणा किंवा चांगलं दिसण्याची उर्मी म्हणा! सध्या हॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीनं एक वेगळं आणि काहीसं विचित्र फेशियल करत सोशल मिडीयावर लक्ष वेधून घेतलंय.
माशाच्या वीर्याचं हे फेशियल चेहऱ्याला लावून जेनिफर ॲनिस्टन (Jenifer Anisten) म्हणजे हॉलिवूडच्या फ्रेंन्ड्स मालिकेतली रेचल पात्र साकारणाऱ्या या लोकप्रीय नटीनं समाजमाध्यमावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. सॅल्मन फिश फेशियल या ट्रीटमेंटचा ॲन्टी एजींग आणि हायड्रेशनसाठी वापर केल्याचं कबूल केल्यानंतर हा ब्यूटी ट्रेंड आता चांगलाच गाजतोय.
काय आहे हे फेशियल?
सॅल्मन स्पर्म फेशियलमधला प्राथमिक घटक म्हणजे या माशाच्या वीर्यापासून तयार करण्यात आलेला डीएनए, ज्याला सोडियम डीएनएही म्हटलं जातं. या फेशियलच्या अँन्टीऑक्सिडन्ट गुणधर्मांमुळे त्वचेचा दाह कमी होतो असं सांगितलं जातंय. तज्ञांच्या मते, सॅल्मन स्पर्म फेशियल हा एक जेल पदार्थ आहे. ज्यामध्ये सॅल्मन माशाच्या वीर्यापासून तयार केलेले डीएनए आणि आरएनएचे मिश्रण आहे. तज्ञांच्या मते, या सॅल्मन माशांमधून शुक्राणू त्यांना त्रास होणार नाही अशा प्रकारे काढले जातात. त्यानंतर त्यांच्यावर प्रक्रीया केल्यानंतर इंजेक्शन दिले जाऊ शकते.
काय होते या फेशिअलने?
इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॉस्मेटिक सायन्समध्ये 2010 मधील आणखी एका अभ्यासात असे आढळून आले की सॅल्मन स्पर्म डीएनए त्वचेची लवचिकता सुधारू शकतो, कोलेजन पातळी वाढवू शकतो आणि हायलुरोनिक ऍसिडचे उत्पादन वाढवू शकतो. 2017 च्या अभ्यासाने या निष्कर्षांचे समर्थन केले, हे दर्शविते की सॅल्मन स्पर्म डीएनए सेल्युलर नुकसान आणि जळजळ कमी करण्यात मदत करते, सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर्समध्ये त्याचा संभाव्य वापर सूचित करते.
या ट्रिटमेंटने खरंच ॲन्टीएजींग थांबते का?
ही ट्रीटमेंट अँटी-एजिंगसाठीच आहे असे दावे करणारे वैज्ञानिक पाठबळ अजून तितकेव्यापक नाही. काही युजर्सना त्वचेचा पोत आणि हायड्रेशनमध्ये सुधारणा दिसली, ज्यामुळे तुम्ही अधिक तरुण दिसू शकता. जोपर्यंत अधिक व्यापक अभ्यास केला जात नाही तोपर्यंत या दाव्यांचे पूर्ण समर्थन करणे आव्हानात्मक असल्याचं तज्ञ सांगतात.