15 फेब्रुवारीपासून सुरु होतोय 'Anti Valentine Week'; 'स्लॅप डे'पासून ते 'ब्रेकअप डे'पर्यंत पाहा संपूर्ण दिवसांची यादी
Anti Valentine Week 2023 : 15 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी हा कालावधी अँटिव्हॅलेंटाईन वीक म्हणून ओळखला जातो. या कालावधीत नेमके कोणते दिवस येतात ते पाहा.
स्लॅप डे : व्हॅलेंटाईन वीक संपल्यानंतर 15 तारखेपासून अँटिव्हॅलेंटाइन वीक सुरू होतो. यामध्ये पहिला दिवस स्लॅप डे म्हणून साजरा केला जातो. जर तुमच्या पार्टनरने तुमची फसवणूक केली असेल तर तुम्ही स्लॅप डेच्या दिवशी तुमच्या प्रेमाचा शेवट करू शकता. स्लॅप डे हा तुमच्या पार्टनरला कानाखाली मारण्यासाठी नाही तर तुमच्या कामातून समोरच्या व्यक्तीला आरसा दाखविण्यासाठी आणि नात्यातून बाहेर पडण्यासाठी साजरा केला जातो.
किक डे : 16 फेब्रुवारी हा किक डे म्हणून साजरा केला जातो. याचा अर्थ असा की, जर तुम्ही गेल्या काही महिन्यांपासून बॅड रिलेशनशिपमधून जात असाल, दुःखातून जात असाल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. टॉक्सिक रिलेशनशिपमधून बाहेर पडा आणि नव्याने सुरुवात करा असा या दिवसाचा अर्थ आहे.
परफ्यूम डे : अँटी व्हॅलेंटाईन वीकचा तिसरा दिवस परफ्यूम डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्वतःसाठी एक छान सुगंधी परफ्यूम खरेदी करा आणि हाच सुगंध परफ्युमप्रमाणे तुमच्या आयुष्यात दरवळू द्या. थोड्यक्यात सांगायचं तर जुन्या आठवणी विसरून नव्याने आयुष्य जगा.
फ्लर्टिंग डे : 18 फेब्रुवारी हा फ्लर्टिंग डे म्हणून साजरा केला जातो. जर तुम्ही सिंगल असाल किंवा तुमचे ब्रेकअप झाले असेल तर तुम्ही या दिवशी फ्लर्ट करू शकता. या दिवशी नवीन लोकांना भेटा मजा करा आणि आनंदी आयुष्य जगा.
कन्फेशन डे : 19 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन वीकचा पाचवा दिवस आहे. याला कन्फेशन डे म्हणतात. तुम्हाला तुमच्या मनाची कबुली एखाद्या खास व्यक्तीसमोर द्यायची असेल किंवा तुमच्याकडून काही चूक झाली असेल, तर ही एक उत्तम संधी आहे.
मिसिंग डे : 20 फेब्रुवारी हा मिसिंग डे म्हणून साजरा केला जातो. जर तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला मिस करत असाल, तर हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही तुमच्या भावना त्या व्यक्तीसमोर व्यक्त करू शकता.
ब्रेकअप डे : अँटी व्हॅलेंटाईन वीकचा शेवटचा दिवस ब्रेकअप डे म्हणून साजरा केला जातो. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल आणि त्या रिलेशनमध्ये खुश नसाल तर हाच तो दिवस आहे अशा नात्यातून वेळीच बाहेर पडा.
महत्त्वाच्या बातम्या :