एक्स्प्लोर

Health Tips : अंगावर खाज येत असेल तर करा 'हे' घरगुती उपाय; लगेच मिळेल आराम

Health Tips : उन्हाळ्यात घामामुळे शरीरात खाज येण्याची समस्या उद्भवते. कधी कधी बराच वेळ खाज सुटल्याने जळजळ होते आणि त्वचा लाल होते.

Health Tips : जास्त उष्णता, ऊन आणि घाम यांमुळे शरीरात खाज येण्याची समस्या वाढते. उन्हाळ्यात, लोक अनेकदा बोचऱ्या उष्णतेची तक्रार करू लागतात, ज्यामध्ये शरीराला खूप खाज सुटते. अनेक वेळा उन्हाळ्यात घामामुळे फंगल इन्फेक्शन होऊन खाज सुटते. अशा वेळी घाबरण्याची गरज नाही. खाज सुटण्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही औषधांऐवजी काही प्रभावी घरगुती उपायांचा अवलंब करू शकता. आज आम्ही तुम्हाला असे घरगुती उपाय सांगत आहोत, ज्याचा वापर केल्याने तुम्हाला खाज येण्यापासून आराम मिळेल. 

बर्फाचा शेक द्या : जर तुम्हाला खूप खाज येण्याची समस्या जाणवत असेल, तर तुम्ही कापसाच्या कपड्यात बर्फाचे तुकडे टाकून त्याचा शेक घेऊ शकता. यामुळे खाज येण्यास आराम मिळेल. ज्या भागात तुम्हाला खाज येत आहे ती जागा दाबा. त्यामुळे खाज आणि सूजही कमी होईल. 

कॅलामाइन लोशन : खाज येण्याची समस्या वाढल्यास डॉक्टर कॅलामाइन लोशन लावण्याचा सल्ला देतात. यामुळे खाज कमी होण्यास मदत होते. या लोशनने खाज येणाऱ्या भागाला काही सेकंद मसाज करा. तुमची समस्या दूर होईल. 

खोबरेल तेल : जर तुमची त्वचा हायड्रेटेड राहिली तर खाजही कमी होते. यासाठी आंघोळीनंतर त्वचा कोरडी करा आणि नंतर त्वचेतून तेल सुकेपर्यंत खोबरेल तेलाने त्वचेला मसाज करा. दिवसातून दोनदा ही रेसिपी फॉलो करा. यामुळे खाजेपासून खूप आराम मिळेल. 

एलोवेरा जेल : जर तुम्हाला खाज येत असेल तर त्या भागावर थोडेसे कोरफड जेल लावून मसाज करा. एलोवेरा जेल दिवसातून दोनदा लावल्याने खाज कमी होईल. एलोवेरा जेलमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात ज्यामुळे त्वचा मुलायम होते. या रेसिपीचा वापर केल्याने त्वचेची खाज सुटते.

लिंबाचा रस : लिंबाच्या रसामध्ये प्रतिजैविक घटक आढळतात, ज्यामुळे खाज शांत होते. लिंबाचा रस थोड्या पाण्यात मिसळून खाजलेल्या भागावर लावा, खूप आराम मिळेल.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बहिणीच्या साथीने वाढली भावाची ताकद; परळी मतदारसंघात तुतारी वाजणार की घड्याळ चालणार?
विधानसभेची खडाजंगी: बहिणीच्या साथीने वाढली भावाची ताकद; परळी मतदारसंघात तुतारी वाजणार की घड्याळ चालणार?
Nana Patole on Devendra Fadnavis : आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
Donald Trump : दोस्तासाठी काय पण! डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये एलाॅन मस्क आणि विवेक रामास्वामींना मोठी जबाबदारी; टीव्ही अँकर संरक्षण मंत्री होणार!
दोस्तासाठी काय पण! डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये एलाॅन मस्क आणि विवेक रामास्वामींना मोठी जबाबदारी; टीव्ही अँकर संरक्षण मंत्री होणार!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Bag Check : सोलापूर दौऱ्यावर राज ठाकरेंच्या बॅगची तपासणी,व्हिडीओ समोरBullet Patil Exclusive | 26 वर्ष पोलीस आता राजकारणात एन्ट्री; बुलेट पाटलांची बुलेटवर मुलाखतBJP Vastav 104 : Sharad Pawar आणि Uddhav Thackeray यांच्यावर टीका करणं भाजप नेते का टाळतायत?Shrikant Shinde at Mahim | विरोधकांच्या पायाखालची जमिन सरकली, सरवणकर निवडून येणारच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बहिणीच्या साथीने वाढली भावाची ताकद; परळी मतदारसंघात तुतारी वाजणार की घड्याळ चालणार?
विधानसभेची खडाजंगी: बहिणीच्या साथीने वाढली भावाची ताकद; परळी मतदारसंघात तुतारी वाजणार की घड्याळ चालणार?
Nana Patole on Devendra Fadnavis : आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
Donald Trump : दोस्तासाठी काय पण! डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये एलाॅन मस्क आणि विवेक रामास्वामींना मोठी जबाबदारी; टीव्ही अँकर संरक्षण मंत्री होणार!
दोस्तासाठी काय पण! डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये एलाॅन मस्क आणि विवेक रामास्वामींना मोठी जबाबदारी; टीव्ही अँकर संरक्षण मंत्री होणार!
शरद पवारांचा व्हिडीओ पोस्ट करणं भोवलं, अजित पवारांची सुनावणीत अडचण, अमोल मिटकरींनी थेट सुप्रीम कोर्टाची माफी मागितली, पोस्टही डिलीट
काल शरद पवारांचा व्हिडीओ पोस्ट झाला आज अमोल मिटकरींनी सुप्रीम कोर्टाची माफी मागितली, काय घडलं?
Photos: बटेंगे तो कटेंगे... योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईतील सभेत टी-शर्टने वेधले लक्ष
Photos: बटेंगे तो कटेंगे... योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईतील सभेत टी-शर्टने वेधले लक्ष
Supreme Court on Ajit Pawar NCP : तुमच्या स्वत:च्या पायावर उभं राहा! शरद पवारांचं नाव का वापरता? अजित पवार गटाला 'सर्वोच्च' फटकार
तुमच्या स्वत:च्या पायावर उभं राहा! शरद पवारांचं नाव का वापरता? अजित पवार गटाला 'सर्वोच्च' फटकार
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Embed widget