(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Air Pollution : प्रदुषणामुळे फु्फ्फुसांवर होतोय परिणाम; फुफ्फुसं जपायचे असतील तर आजच 'या' पदार्थांचा आहारात समावेश करा
Air Pollution : जे लोक भरपूर धूम्रपान करतात किंवा दम्याचे रुग्ण आहेत त्यांना फुफ्फुसे निरोगी ठेवण्याची सर्वाधिक गरज असते.
Air Pollution : प्रदूषणामुळे दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांची अवस्था फार वाईट झाली आहे. प्रदूषणाचा (Air Pollution) सर्वाधिक विपरीत परिणाम माणसांच्या फुफ्फुसांवर होतो. दिवाळीचा (Diwali 2023) सण देखील अवघ्या काही दिवसांवर आहे. अशातच फटाक्यांमुळे प्रदुषणात आणखी वाढ होणार आहे. दिल्लीच्या काही भागांत AQI 600 पेक्षा जास्त प्रदूषण आहे. अशा वेळी नागरिकांनी आपल्या फुफ्फुसांची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. जे लोक भरपूर धूम्रपान करतात किंवा दम्याचे रुग्ण आहेत त्यांना फुफ्फुसे निरोगी ठेवण्याची सर्वाधिक गरज असते. याशिवाय सामान्य लोकांनीही आपली फुफ्फुसे निरोगी ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. आज आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची फुफ्फुस निरोगी राहू शकतात.
रोज रिकाम्या पोटी सफरचंद खा
आपल्या आरोग्यासाठी सफरचंद खूप फायदेशीर आहे. सफरचंद शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्समध्ये समृद्ध असतात, जे पेशींचं नुकसान होण्यापासून वाचवतात. जर तुम्ही रोज सफरचंदाचं सेवन केलं तर तुमची फुफ्फुसे चांगली कार्य करतात आणि निरोगी राहतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तुम्ही आठवड्यातून किमान 5 सफरचंद खावेत. यामुळे फुफ्फुसाशी संबंधित रोग COPD होण्याचा धोका कमी होतो. याशिवाय दमा आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोकाही कमी होतो.
भोपळा
लोक सहसा भोपळा ही एक सामान्य भाजी मानतात. पण त्यात बीटा कॅरोटीन, ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन सारखे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट मुबलक प्रमाणात आढळतात. भोपळ्याचे सेवन केल्याने तुमचे फुफ्फुस निरोगी राहण्यास मदत होते. भोपळ्यामध्ये शक्तिशाली दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात, ज्यामुळे फुफ्फुसाच्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो. संशोधनानुसार, जर तुमच्या रक्तामध्ये कॅरोटीनॉइड्सचे प्रमाण चांगले असेल तर तुमचे फुफ्फुसे चांगले कार्य करतात. जे लोक सिगारेट ओढतात त्यांनी भोपळ्याचे सेवन करावे.
हळद
हळद तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. हळद अत्यंत शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्समध्ये समृद्ध आहे. कर्क्युमिन हे हळदीतील सर्वात महत्वाचे सक्रिय कंपाऊंड आहे, जे तुमच्या फुफ्फुसांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. एका अभ्यासानुसार, जे लोक कर्क्यूमिनचे अधिक सेवन करतात, त्यांची फुफ्फुसे निरोगी राहतात.
टोमॅटो
जर तुम्हाला तुमच्या फुफ्फुसांना आजारांपासून वाचवायचे असेल तर तुम्ही टोमॅटोचं जास्त सेवन करणं गरजेचं आहे. टोमॅटोमध्ये लाइकोपीन नावाचा घटक आढळतो, जो कॅरोटीनॉइड अँटीऑक्सिडंटचा एक प्रकार आहे. लाइकोपीन हे देखील एक संयुग आहे जे तुमच्या फुफ्फुसांना निरोगी ठेवते. संशोधनानुसार, जे लोक टोमॅटोचे जास्त सेवन करतात त्यांना श्वसनमार्गाशी संबंधित आजार कमी होतात. त्यामुळे अस्थमाच्या रुग्णांसाठी टोमॅटो फायदेशीर मानला जातो.
हर्बल टी
जर तुम्हाला तुमची प्रतिकारशक्ती वाढवायची असेल आणि तुमची फुफ्फुसे निरोगी ठेवण्यासाठी चहा, कॉफीऐवजी हर्बल टी प्या. यासाठी तुम्ही आलं, हळद, लिंबू, मध आणि दालचिनी घालून हर्बल टी बनवू शकता. यामुळे तुमची फुफ्फुसे निरोगी राहतील.
ग्रीन टी
ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट्स देखील आढळतात, जे तुमच्या फुफ्फुसाच्या ऊतींना निरोगी ठेवण्यास मदत करतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )