(Source: ECI/ABP News/ABP Majha)
9th July 2022 Important Events : 9 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
9th July 2022 Important Events : जुलै महिन्यातील प्रत्येक दिनाचं महत्व नेमकं काय आहे हे जाणून घ्या.
9th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. जुलै महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 9 जुलैचे दिनविशेष.
1951 : भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली.
1944 : साली ब्रिटीशांच्या राजवटीपासून भारताला स्वतंत्र करण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले.
1921 : साली भारतीय राजकारणी, माजी लोकसभा सदस्य तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि जनसंघ या राजकीय पक्षाचे पहिले सरचिटणीस व भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रादेशिक अध्यक्ष रामभाऊ म्हाळगी यांचा जन्मदिन.
1944 : साली युद्धप्रसंगी राष्ट्रकुल सैन्याला पुरविल्या जाणार्या सेवाप्रसंगी शत्रूच्या सामन्यात शौर्याचा सर्वात उच्च आणि प्रतिष्ठित पुरस्कार व्हिक्टोरिया क्रॉसचे विजेता फ्रँक गेराल्ड ब्लॅकर (Frank Gerald Blaker) यांचे निधन.
1925 : साली गुरु दत्त म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व अभिनेते वसंत कुमार शिवशंकर पादुकोण यांचा जन्मदिन.
1819 : साली शिलाई मशीनचा शोध लावणारे अमेरिकन संशोधक एलिआस हॉवे (Elias Howe) यांचा जन्मदिन.
1845 : साली ब्रिटीश कालीन भारतातील सन 1905-1910 काळातील व्हाईसरॉय आणि भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड मिण्टो (Lord Minto) द्वितीय यांचा जन्मदिन.
1900 : साली भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे राजकारणी आणि माजी संसदीय कार्यमंत्री तसचं, मध्यप्रदेश राज्याचे माजी राज्यपाल सत्य नारायण सिन्हा यांचा जन्मदिन.
महत्वाच्या बातम्या :
- Important Days in July : जुलै महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?
- 4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
- 3rd July 2022 Important Events : 3 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना