एक्स्प्लोर

29th August 2022 Important Events : 29 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

29th August 2022 Important Events : ऑगस्ट महिन्यातील 29 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या.

29th August 2022 Important Events : ऑगस्ट महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. ऑगस्ट महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. विविध सणवारांचा श्रावण महिना संपून आजपासून भाद्रपद महिन्याला सुरुवात झाली आहे. भाद्रपद महिन्यात गणपतीचे आगमन देखील होते. तसेच पितृपक्ष पंधरवडा सुद्धा याच महिन्यात येतो. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस भाद्रपद महिन्यात येतात. हे जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 29 ऑगस्टचे दिनविशेष.

राष्ट्रीय क्रीडा दिन 

राष्ट्रीय क्रीडा दिन हा विविध देशांमध्ये राष्ट्रीय क्रीडा संघ आणि त्या देशांच्या क्रीडा परंपरांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी हा साजरा केला जातो. भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांची जयंती या दिवशी असल्याने हा दिवस साजरा करण्यात येतो. हा दिवस 1928, 1932 आणि 1936 मध्ये भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारे हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा वाढदिवस आजच्या दिवशी असतो त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय क्रिडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे भारतीय आणि जागतिक हॉकीमधील एक महान व्यक्तिमत्त्व होते.

सन 1947 साली भारतीय संविधान सभेने संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना करण्यात आली.

इ.स. 1880 साली पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय शिक्षणतज्ञ, स्वातंत्र्यसेनानी, आधुनिक संस्कृत कवी आणि राजकारणी डॉ माधव श्रीहरी अणे यांचा जन्मदिन.

इ.स. 1887  साली ब्रिटीश कालीन भारतातील प्रख्यात चिकित्सक आणि देशसेवक तसेच, गुजरात राज्याचे पहिले मुख्यमंत्री सेवक जीवराज मेहता यांचा जन्मदिन.

सन 1949 साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय अवकाश वैज्ञानिक आणि भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे प्रमुख आणि माजी अध्यक्ष, तसचं अवकाश आयोगाचे माजी अध्यक्ष, के. राधाकृष्णन यांचा जन्मदिन.

सन 1976 साली भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक आणि हिंदु मुस्लिम ऐक्याचे समर्थक असलेले बंगाली कवी, लेखक आणि संगीतकार काझी नझरूल इस्लाम यांचे निधन.

सन 1986 साली महाराष्ट्रीयन मराठी शिक्षणतज्ञ आणि पुणे येथील महाराष्ट्र विद्यालयाचे संस्थापक तसचं, पुणे विद्यार्थी गृहाचे संस्थापक सदस्य गजानन श्रीपत खैर यांचे निधन.

सन 2007 साली ब्रिटीश राजवटील प्रसिद्ध भारतीय स्वातंत्र सेनानी, भारतीय राजकारणी आणि हरियाणा राज्याचे माजी चौथे मुख्यमंत्री बनारसी दास गुप्ता यांचे निधन.

सन 2008 साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेत्री जयश्री गडकर यांचे निधन.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Wine and beer shops: तुमच्या एरियातील दारुचे दुकान बंद करायचे असेल तर मतदान घेता येणार, महायुती सरकारचा गेमचेंजर निर्णय
तुमच्या एरियातील दारुचे दुकान बंद करायचे असेल तर मतदान घेता येणार, महायुती सरकारचा गेमचेंजर निर्णय
मृत्यू अटळ सत्य असलं तरी त्याचे सुद्धा 14 प्रकार; गरुड पुराणामध्ये नेमकं म्हटलं आहे तरी काय?
मृत्यू अटळ सत्य असलं तरी त्याचे सुद्धा 14 प्रकार; गरुड पुराणामध्ये नेमकं म्हटलं आहे तरी काय?
Lilavati Hospital Black Magic: आठ मडकी, तांदूळ, केस अन् तंत्रमंत्र विद्येचं साहित्य, लीलावती रुग्णालयात जे सापडलं ते पाहून भल्याभल्यांची बोबडी वळाली
आठ मडकी, तांदूळ, केस अन् तंत्र-मंत्राचं साहित्य, लीलावती रुग्णालयातील दृश्य पाहून भल्याभल्यांची बोबडी वळाली
Yuvraj Singh :6,6,6,6,6,6,6... युवराज सिंगनं षटकारांचा पाऊस पाडला, मास्टर्स लीगच्या उपांत्य फेरीत भारतानं ऑस्ट्रेलियाला लोळवलं
ऑस्ट्रेलिया म्हटलं की युवराज सिंगची बॅट तळपते, मास्टर्स लीगमध्ये 7 षटकार ठोकले, भारताचा दणदणीत विजय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Satish Bhosale Beed : खोक्याचं 'पार्सल' बीडमध्ये दाखल, माज करणाऱ्या सतीशला धरुन पोलीस स्थानकात नेलंABP Majha Headlines : 09 AM : 14 March 2025 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSatish Bhosale House : धक्कादायक! अज्ञातांनी पेटवून दिला सतीश भोसलेच्या घराबाहेरचा परिसरJalgaon Accident : रेल्वे गेट तोडून ट्रक ट्रॅकवर, अमरावती एक्सप्रेसची धडक, जळगावमध्ये अपघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Wine and beer shops: तुमच्या एरियातील दारुचे दुकान बंद करायचे असेल तर मतदान घेता येणार, महायुती सरकारचा गेमचेंजर निर्णय
तुमच्या एरियातील दारुचे दुकान बंद करायचे असेल तर मतदान घेता येणार, महायुती सरकारचा गेमचेंजर निर्णय
मृत्यू अटळ सत्य असलं तरी त्याचे सुद्धा 14 प्रकार; गरुड पुराणामध्ये नेमकं म्हटलं आहे तरी काय?
मृत्यू अटळ सत्य असलं तरी त्याचे सुद्धा 14 प्रकार; गरुड पुराणामध्ये नेमकं म्हटलं आहे तरी काय?
Lilavati Hospital Black Magic: आठ मडकी, तांदूळ, केस अन् तंत्रमंत्र विद्येचं साहित्य, लीलावती रुग्णालयात जे सापडलं ते पाहून भल्याभल्यांची बोबडी वळाली
आठ मडकी, तांदूळ, केस अन् तंत्र-मंत्राचं साहित्य, लीलावती रुग्णालयातील दृश्य पाहून भल्याभल्यांची बोबडी वळाली
Yuvraj Singh :6,6,6,6,6,6,6... युवराज सिंगनं षटकारांचा पाऊस पाडला, मास्टर्स लीगच्या उपांत्य फेरीत भारतानं ऑस्ट्रेलियाला लोळवलं
ऑस्ट्रेलिया म्हटलं की युवराज सिंगची बॅट तळपते, मास्टर्स लीगमध्ये 7 षटकार ठोकले, भारताचा दणदणीत विजय
Market Crash : इतिहासातील सर्वात मोठं मार्केट क्रॅश होणार, ट्रम्प यांच्या ट्रेड वॉरमुळं भीतीचं वातावरणं, रॉबर्ट कियोसाकीचा काळजी वाढवणारा इशारा
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्रेड वॉरमुळं जगभर घबराट, इतिहासातील सर्वात मोठं मार्केट क्रॅश होणार, नामवंत लेखकाचा काळजी वाढवणारा इशारा  
दिलासादायक! दूध उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत अनुदान खात्यात जमा होणार; अनुदानासाठी 759 कोटी रुपयांना मंजुरी
दिलासादायक! दूध उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत अनुदान खात्यात जमा होणार; अनुदानासाठी 759 कोटी रुपयांना मंजुरी
Satish Bhosale : होळीच्या दिवशीच खोक्या भोसलेंचं घर पेटवलं, जीवनावश्यक वस्तू जळून खाक, बीडमध्ये खळबळ
होळीच्या दिवशीच खोक्या भोसलेंचं घर पेटवलं, जीवनावश्यक वस्तू जळून खाक, बीडमध्ये खळबळ
Virar : सुटकेसमध्ये सापडलं महिलेचं मुंडकं, इतर अवयवांचा पत्ता नाही, विरारमध्ये खळबळ
सुटकेसमध्ये सापडलं महिलेचं मुंडकं, इतर अवयवांचा पत्ता नाही, विरारमध्ये खळबळ
Embed widget