2025 Long Weekends: 2025 मध्ये फिरायचा आहे प्लॅन? कधी आणि कोणत्या महिन्यात जाल? पुढील वर्षातील सर्व Long Weekends जाणून घ्या..
2025 Long Weekends: तुम्हीही पुढच्या वर्षी प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर कोणत्या महिन्यात मोठा वीकेंड कधी येणार? यानुसार तुम्ही ट्रीपचे नियोजन करू शकता.
2025 Long Weekends: 2025 नववर्षाची सुरूवात व्हायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. देशासह जगभरात नववर्षाच्या आगमनाची मोठ्या उत्साहात तयारी सुरू आहे. या नवीन वर्षात तुम्हालाही तुमच्या कुटुंबासोबत फिरायला जायचं असेल तर आज आम्ही तुम्हाला पुढील वर्षातील सर्व Long Weekends बद्दल सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही त्यानुसार फिरण्याचा प्लॅन करू शकता...
प्रवासासाठी बरेच लोक लांब वीकेंडची वाट पाहतात...
विविध ठिकाणी फिरायला, प्रवास करायला जवळपास सगळ्यांनाच आवडतो. त्यामुळे जेव्हा कधी कोणाला वेळ मिळेल तेव्हा ते त्यांच्या आवडत्या ठिकाणी मौजमजा करण्यासाठी पोहचतात. जेव्हा प्रवासाचा विचार केला जातो तेव्हा बरेच लोक लांब वीकेंडची वाट पाहतात. विशेषतः नोकरी करणारे लोक लांब वीकेंडची वाट पाहतात, कारण जेव्हा त्यांना दीर्घ सुट्टी मिळते तेव्हा कोणीही मुक्तपणे प्रवास करू शकतो. या लेखात आम्ही तुम्हाला 2025 मध्ये येणाऱ्या सर्व लाँग वीकेंडबद्दल सांगणार आहोत. लाँग वीकेंडची माहिती घेतल्यानंतर तुम्ही सहलीचे नियोजनही करू शकता.
जानेवारीतील लाँग वीकेंड
2025 मधील लाँग वीकेंडबद्दल बोललो तर जानेवारीमध्ये सात ते चार दिवस सलग सुट्टी असणार आहे. तारखेवरून समजून घेऊ.
11 जानेवारी शनिवार सुट्टी-विकेंड
12 जानेवारी रविवार सुट्टी - शनिवार व रविवार
13 जानेवारीला तुम्ही एक सुट्टी टाकू शकता
14 जानेवारीला मकर संक्रांतीची सुट्टी
10 जानेवारीला रात्री उशिरा कामानंतर ट्रीपसाठी बाहेर गेल्यास, तुम्हाला लाँग वीकेंडमध्ये प्रवास करण्याची पूर्ण संधी मिळेल.
फेब्रुवारीचा लॉंग वीकेंड
तुम्हाला फेब्रुवारीमध्ये लांब वीकेंड मिळणार नाही, कारण हा महिना फक्त 28 दिवसांचा आहे. तुम्ही कोणत्याही शुक्रवारी रात्री बाहेर जाऊ शकता किंवा शनिवार-रविवारी भेट देऊ शकता.
मार्च मध्ये लॉंग वीकेंड
मार्चमध्ये लाँग वीकेंड असणार आहे. मार्च लाँग वीकेंडमध्ये तुम्ही देशातील अनेक अद्भुत आणि सुंदर ठिकाणे एक्सप्लोर करू शकता.
होलिका दहन गुरुवार 13 मार्च रोजी आहे.
धुलिवंदन शुक्रवार, 14 मार्च रोजी आहे.
15-16 रोजी शनिवार-रविवार आहे.
मार्चमधील दुसरा लाँग वीकेंड
शनिवार, 29 मार्चपासून सुरू होत आहे.
रविवारी 30 तारखेला सुट्टी
31 तारखेला ईद उल फित्रची सुट्टी असू शकते.
एप्रिल मध्ये लांब वीकेंड
एप्रिल महिन्यापासून देशातील जवळपास सर्वच भागात उन्हाळा सुरू होतो. अशा परिस्थितीत, एप्रिलमध्ये येणाऱ्या लाँग वीकेंडमध्ये तुम्ही प्रवास करण्याचा विचार करू शकता.
10 एप्रिल रोजी महावीर जयंती
11 एप्रिल रोजी सुट्टी घ्यावी लागेल
12-13 मार्च हा शनिवार-रविवार आहे.
18 एप्रिल रोजी गुड फ्रायडेची सुट्टी आहे
19-20 मार्च रोजी शनिवार-रविवार सुट्टी असेल.
मे मध्ये लांब वीकेंड
मे महिन्यातही तीन दिवसांचा वीकेंड येऊ शकतो. या लांब विकेंडमध्ये तुम्ही जवळपासची अद्भुत ठिकाणे एक्सप्लोर करू शकता.
10-11 मे शनिवार-रविवार आहे.
12 सोमवारी बुद्ध पौर्णिमेची सुट्टी.
जून-जुलैमध्ये लाँग वीकेंड
जून-जुलै हे दोन महिने असे असतात की, जेव्हा तुम्हाला वीकेंडची लांब रजा मिळणे अशक्य असते. शुक्रवारी तुम्ही कार्यालयातून सुट्टी घेऊ शकता. शनिवार आणि रविवारी प्रवास करण्याचा विचार करू शकता.
ऑगस्टमध्ये लाँग वीकेंड
ऑगस्ट हा वर्षातील एक महिना असतो, जेव्हा संपूर्ण देश स्वातंत्र्यदिन साजरा करतो. अशावेळी स्वातंत्र्यदिन लाँग वीकेंडचा आनंद घेऊन येणार आहे.
15 ऑगस्ट- शुक्रवार- स्वातंत्र्यदिन आणि श्रीकृष्ण जयंती
हे शनिवार-रविवार, 16-17 आहे.
16-17 - गोपाळकाला, रविवार
सप्टेंबर मध्ये लाँग वीकेंड
सप्टेंबर 2025 हा महिनाही लाँग वीकेंड सुट्ट्या घेऊन येणार आहे. या छोट्या मोठ्या वीकेंडमध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबासह जवळपासच्या ठिकाणांना भेट देऊ शकता.
5 सप्टेंबर, शुक्रवार - ईद आणि ओणमची सुट्टी.
6-7 ला शनिवार-रविवार सुट्टी आहे.
ऑक्टोबर मध्ये लाँग वीकेंड
ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला प्रत्येकी दोन लांब वीकेंड मिळणार आहेत.
1 ऑक्टोबरला महानवमी.
2 ऑक्टोबर दसरा.
तुम्ही 3 ऑक्टोबरला ऑफिसमधून सुट्टी घेऊ शकता.
4-5 शनिवार आणि रविवार आहेत.
ऑक्टोबरचा दुसरा लाँग वीकेंड
18 - धनत्रयोदशी
19 - रविवार
20 - नरक चतुर्दशी
21 -लक्ष्मीपूजन
22 -बलिप्रतिपदा
23 ऑक्टोबर रोजी भाऊबीज आहे.
24 ऑक्टोबर- तुम्ही शुक्रवारी सुट्टी घेऊ शकता.
शनिवार-रविवार ऑक्टोबर 25-26 आहे.
नोव्हेंबर मध्ये लाँग वीकेंड
नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी निराशा घेऊन येणार आहे. या महिन्यात कोणताही लाँग वीकेंड असणार नाही. तुम्ही शुक्रवारी कार्यालयातून सुट्टी घेऊ शकता आणि शनिवार आणि रविवारी प्रवास करण्याचा विचार करू शकता.
डिसेंबरमध्ये लाँग वीकेंड
ख्रिसमसच्या निमित्ताने डिसेंबरमध्ये तुम्ही लांब वीकेंडची सुट्टी घेऊ शकता.
25 डिसेंबर नाताळची सुट्टी
शुक्रवार 26 डिसेंबर रोजी तुम्हाला सुट्टी घ्यावी लागेल.
तो शनिवार-रविवार, नोव्हेंबर 27-28 आहे.
हेही वाचा>>>
Tirupati Online Darshan: व्यंकटरमणा...गोविंदा.. तिरुपती दर्शनासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू, कसं कराल बुकिंग? गर्दी टाळण्यासाठी काय काळजी घ्याल?
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )