19th June 2022 Important Events : 19 जून दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
19th June 2022 Important Events : जून महिन्यातील प्रत्येक दिनाचं महत्व नेमकं काय आहे हे जाणून घ्या.
19th June 2022 Important Events : जून महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. जून महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 19 जून चे दिनविशेष.
19 जून : जागतिक पितृदिन (World Father’s Day)
'फादर्स डे' ची मूळ कल्पना अमेरिकेची आहे. सर्वात आधी पितृदिन 19 जून 1909 मध्ये साजरा केला गेला होता. खरे पाहता, वॉशिंग्टन च्या स्पोकेन शहरात सोनोरा डॉड ने आपल्या वडीलांच्या आठवणींत या दिवसाची सुरुवात केली होती. हा दिवस फादर्स डे म्हणून साजरा करण्याची प्रेरणा त्यांना 1909 मध्ये सुरु झालेल्या 'मदर्स डे' पासून मिळाली. भारतातही हा दिवस अनेक ठिकाणी साजरा केला जातो. या दिवशी वडिलांना शुभेच्छा आणि वेगवेगळ्या भेटवस्तू देखील दिल्या जातात.
1966 : शिवसेना पक्षाची स्थापना.
शिवसेना हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. शिवसेनेची स्थापना हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी केली. मुंबई मधे मराठी माणसांवर होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली. सध्या या या पक्षाची जबाबदारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
1970 : भारतीय राजकारणी राहुल गांधी यांचा जन्म.
राहुल गांधी हे भारतीय राजकारणी आणि संसद सदस्य आहेत. ते केरळमधील वायनाड मतदारसंघाचे 17व्या लोकसभेत प्रतिनिधित्व करतात. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य असून त्यांनी 16 डिसेंबर 2017 ते 3 जुलै 2019 या कालावधीत काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे.
1676 : शिवाजी महाराजांनी प्श्चात्त्पादग्ध सरनोबत नेताजी पालकर यांना विधीपूर्वक शुद्ध करून हिंदू धर्मात पुन्हा समाविष्ट केले.
1862 : अमेरिकेने गुलामगिरीची प्रथा बेकायदा जाहीर केली.
1865 : अमेरिकेतील गॅल्व्हेस्टन येथील गुलामांना मुक्ती. हा दिवस येथपासून जून्टीन्थ या नावाने साजरा केला जातो.
1912 : अमेरिकेत कामगारांसाठी 8 तासांचा दिवस निश्चित करण्यात आला.
1949 : चार्लोट मोटर स्पीडवे येथे पहिल्यांदा नासकारची स्पर्धा आयोजित केली गेली.
महत्वाच्या बातम्या :