16th June 2022 Important Events : 16 जून दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
16th June 2022 Important Events : जून महिन्यातील प्रत्येक दिनाचं महत्व नेमकं काय आहे हे जाणून घ्या.
16th June 2022 Important Events : जून महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. जून महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 16 जून चे दिनविशेष.
1914 : सहा वर्षांच्या तुरुंगवासातून लोकमान्य टिळकांची सुटका
1963 : व्हॅलेन्तिना तेरेश्कोवा या रशियन महिलेने वोस्तोक – 6 या यानातून अंतराळप्रवास करुन जगातील पहिला अंतराळ वीरांगना होण्याचा मान मिळवला.
सन 1963 साली रशियन अंतराळवीर व्हॅलेंटाइना व्लादिमिरोवना तेरेशकोवा (Valentina Vladimirovna Tereshkova) ह्या अंतराळात उड्डाण करणाऱ्या त्या पहिल्या आणि सर्वात तरुण महिला ठरल्या.
2007 : भारत वंशीय अमेरिकन अंतराळवीर सुनिता विलियम्स अवकाशात जास्त काळ राहणाऱ्या पहिल्या महिला बनल्या.
2010 : तंबाखूवर पूर्णपणे बंदी करणारा भूतान हा जगातील पहिला देश बनला.
1952 : प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा जन्मदिन.
मिथुन चक्रवर्ती हे एक भारतीय अभिनेता, गायक, चित्रपट निर्माता, लेखक आहेत. त्यांना दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार तर तीन वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाकडून ते राज्य सभेवर सदस्य देखील होते. मृग्या (1976) हा त्यांचा पहिला चित्रपट. या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
1968 : ‘आम आदमी पक्षाचे’ संस्थापक आणि अध्यक्ष, समाजसेवक अरविंद केजरीवाल यांचा जन्मदिन.
अरविंद केजरीवाल हे भारतातील एक सामाजिक कार्यकर्ते, आम आदमी पार्टीचे संस्थापक आणि पक्षाध्यक्ष आणि दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी माहितीच्या अधिकार कायद्याच्या मसुद्यावर अरविंद केजरीवाल यांनी काम केले. माहिती अधिकाराचा कायदा आणि जनलोकपाल संमत व्हावा यासाठी त्यांनी अण्णा हजारे ह्यांच्यासोबत काम केले.
महत्वाच्या बातम्या :