एक्स्प्लोर

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिन्यातील 13 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या.

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण महिना आणि विविध सणवार हे जणू समीकरणच. आज 13 ऑगस्ट म्हणजेच अश्वत्थ मारूती पूजनाचा दिवस. श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्र्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे. त्याचबरोबर भारतातील, माळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या 'तत्त्वज्ञानी राणी' म्हणून ओळखल्या अहिल्याबाई होळकर यांची तारखेप्रमाणे पुण्यतिथी. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 13 ऑगस्ट दिनविशेष.

अश्वत्थ मारूती पूजन :

श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्र्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे. दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे. त्यामुळे त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो. पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णूपूजा करणे असे मानले जाते. पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे. तसेच मारुती नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची अशा वेगवेगळ्या पूजादेखील केल्या जातात. 

13 ऑगस्ट : आचार्य अत्रे जयंती.

प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी आणि वक्ते होते. जन्म 13 ऑगस्ट 1898 रोजी झाला. आचार्य अत्रे महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते. 

13 ऑगस्ट : अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी (तारखेप्रमाणे).

अहिल्याबाई होळकर या भारतातील, माळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या 'तत्त्वज्ञानी राणी' म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नर्मदा तीरी, इंदूरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय आणि सैन्याच्या कामात पारंगत केलेल होते. त्या आधाराने अहिल्याबाईंनी इ.स. 1766 ते इ.स. 1795, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले होते.

1936 : चित्रपट अभिनेत्री वैजयंतीमाला बाली ऊर्फ वैजयंतीमाला यांचा जन्म.

सन 1936 साली भारतीय चित्रपट अभिनेत्री, भरतनाट्यम नर्तक, कर्नाटकी गायक, नृत्यदिग्दर्शक आणि माजी संसद सदस्या वैजयंतीमाला यांचा जन्मदिन.

1988 : चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’चे (FTII) पहिले संचालक गजानन जागीरदार यांचे निधन.

1890 : त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा ’बालकवी’ – 1907 साली जळगाव येथे भरलेल्या पहिल्या कविसंमेलनात वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी केलेल्या कवितावाचनाने प्रभावित होऊन संमेलनाचे अध्यक्ष कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी त्यांना ’बालकवी’ ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला. (मृत्यू: 5 मे 1918)

सन 1913 साली ब्रिटीश शास्त्रज्ञ हॅरी ब्रेअर्ली शेफिल्ड (Harry Brearley Sheffield ) यांनी स्टेनलेस स्टील चा शोध लावला.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
Shravan 2026 : भारतात श्रावण महिना दोन वेगवेगळ्या तारखांना का सुरू होतो? 'श्रावण' नावाची उत्पत्ती कशी झाली? वाचा यामागील काही रंजक गोष्टी
भारतात श्रावण महिना दोन वेगवेगळ्या तारखांना का सुरू होतो? 'श्रावण' नावाची उत्पत्ती कशी झाली? वाचा यामागील काही रंजक गोष्टी
Waist to Hip Ratio: वजन कमी असूनही धोका असू शकतो! केवळ BMI नाही, Waist-to-hip ratio तपासणंही गरजेचं, कारण...
वजन कमी असूनही धोका असू शकतो! केवळ BMI नाही, Waist-to-hip ratio तपासणंही गरजेचं, कारण...
Kitchen Cockroach Control : स्वयंपाकघरातून रात्रीच झुरळे बाहेर का पडतात? 'ही' आहेत 5 मुख्य कारणे आणि सोपे उपाय
स्वयंपाकघरातून रात्रीच झुरळे बाहेर का पडतात? 'ही' आहेत 5 मुख्य कारणे आणि सोपे उपाय

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
Bhiwandi Building Collapses: तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
Embed widget