(Source: ECI/ABP News/ABP Majha)
12th August 2022 Important Events : 12 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
12th August 2022 Important Events : ऑगस्ट महिन्यातील 12 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या.
12th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण महिना आणि विविध सणवार हे जणू समीकरणच. आज 11 ऑगस्ट म्हणजेच भावा-बहिणीच्या अतूट नात्याचा दिवस म्हणजेच रक्षाबंधन. त्याचबरोबर कोळी बांधवांचा नारळी पौर्णिमा हा सण देखील आज आहे. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 11 ऑगस्ट दिनविशेष.
वरदलक्ष्मी व्रत.
श्रावण महिन्यातील दुसऱ्या शुक्रवारी लक्ष्मीदेवीची उपासना मोठ्या प्रमाणावर केली जाते. या दिवशी घराची साफसफाई केली जाते. पूजेची तयारी केली जाते. वरदलक्ष्मी व्रताचा संकल्प केला जातो. तसेच चौरंग मांडून त्यावर कलश ठेवून वरदलक्ष्मीचे आवाहन करावे. या दिवशी देवीला नैवेद्य दाखवावा. सुवासिनींना वाण द्यावे. तसेच वरदलक्ष्मी कहाणीचे पठण करावे.
जरा-जिवंतिक पूजन :
श्रावणात दर शुक्रवारी जरा-जिवंतिका पूजन केले जाते. जरा ही मूळची राक्षसी होती. ती मगध देशात असे. मगध नरेश वृद्धाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असलेला मुलगा झाला. तो जन्मताच त्याला नगराबाहेर फेकून देण्यात आले. त्यावेळी ह्या जरा राक्षसीने ती दोन शकले एकत्र जुळविली आणि त्या अर्भकाला जीवदान दिले. म्हणून ते बालक ‘जरासंध’ ह्मा नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे मगध देशात जरा राक्षसीचा महोत्सव केला जाऊ लागला. लोक तिला अनेक मुलांची आई समजू लागले. घरोघरी तिची पूजा होऊ लागली. महाराष्ट्रात अशीच जिवतीची पूजा श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी केली जाते. त्यासाठी आजूबाजूला बरीच लहान मुले असलेला जिवंतिका म्हणजे जिवतीचे चित्र भिंतीवर लावले जाते अथवा गंधाने काढले जाते. असे चित्र काढून मग तिची पूजा करावी. ह्या पूजेसाठी दूर्वा, फुले, आघाड्याची पाने असणे आवश्यक मानले आहे. ह्मा तिन्हींची माळ करून ती जिवतीला घालावी. पुरणा-वरणाचा नैवेद्य दाखवावा. मग पूजेला बोलाविलेल्या स्त्रियांना हळदकुंकू देऊन जेवू घालावे.
1973 : गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे संस्थापक, उद्योगपती दयानंद बाळकृष्ण ऊर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांचे निधन. (जन्म: 12 मार्च 1911)
2000 : प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची गांधी सेवा पुरस्कारासाठी निवड
1989 : कुसूमाग्रज यांच्या अध्यक्षतेखाली पहिली ’जागतिक मराठी परिषद’ मुंबई येथे सुरू झाली.
महत्वाच्या बातम्या :