एक्स्प्लोर

Shravan 2026 : भारतात श्रावण महिना दोन वेगवेगळ्या तारखांना का सुरू होतो? 'श्रावण' नावाची उत्पत्ती कशी झाली? वाचा यामागील काही रंजक गोष्टी

Shravan 2026 : भारतातील काही राज्यांमध्ये श्रावण महिना एका ठराविक तारखेला सुरु होतो तर काही ठिकाणी तो एक महिन्याआधी सुरु होतो.

Shravan 2026 : श्रावण (Shravan 2026) महिना हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र महिन्यांपैकी एक मानला जातो. भगवान शंकराची उपासना, रुद्राभिषेक, जलाभिषेक, व्रत आणि विविध धार्मिक विधींमुळे या महिन्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. मात्र, दरवर्षी एक प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. भारतातील काही राज्यांमध्ये श्रावण महिना एका ठराविक तारखेला सुरु होतो तर काही ठिकाणी तो एक महिन्याआधी सुरु होतो. खरंतर, यामागे कोणताच मतभेद नाही. पण, हिंदू पंचांगच्या दोन वेगवेगळ्या गणना पद्धती कारणीभूत आहेत. त्यामुळे तारखा वेगळ्या असल्या तरी श्रावण महिन्याचे धार्मिक महत्त्व सर्वत्र समानच राहते.

श्रावण नावाची उत्पत्ती कशी झाली? 

'श्रावण' हा शब्द संस्कृतमधील 'श्रवण' नक्षत्रावरून तयार झाला आहे. जोतिष शास्त्रानुसार, चांद्रमासाला श्रावण मास असे म्हणतात. त्यामुळे या महिन्याचे नाव थेट आकाशातील नक्षत्राशी संबंधित आहे.

हिंदू पंचांगाच्या दोन पद्धती

भारतात हिंदू पंचांगाच्या प्रामुख्याने दोन पद्धती प्रचलित आहेत, पौर्णिमा आणि अमावस्या. याच दोन पद्धतींमुळे श्रावण महिन्याच्या प्रारंभ आणि समाप्तीच्या तारखांमध्ये फरक दिसून येतो.

पौर्णिमा पंचांग 

पौर्णिमा पद्धतीमुळे पौर्णिमानंतरच्या दुसर्‍या दिवसापासून नवीन महिना सुरू होतो आणि पुढील पौर्णिमेला संपतो. ही पद्धत मुख्यत: उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि इतर अनेक राज्यांमध्ये पाळली जाते. 

अमावस्या पंचांग 

अमावस्या पद्धतीमध्ये अमावस्या नंतरच्या दुसर्‍या दिवसापासून नवीन महिना सुरू होतो आणि पुढील अमावस्येला संपतो. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा तसेच दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये ही पद्धत प्रचलित आहे. 

श्रावणाच्या तारखा वेगळ्या का असतात? 

पौर्णिमा आणि अमावस्या या दोन्ही पंचांगांमध्ये महिन्याची सुरूवात वेगवेगळ्या तिथिपासून होत असल्याने श्रावण महिन्याची सुरुवात आणि समाप्तीच्या तारखांमध्ये फरक दिसून येतो. त्यामुळे उत्तर भारत आणि दक्षिण भारतातील कॅलेंडरमध्ये श्रावणाच्या तारखा वेगवेगळ्या दिसतात.

मात्र, हा फरक फक्त पंचांगाच्या गणनेच्या पद्धतीचा आहे. धार्मिक शद्धा, भगवान शंकरावरील भक्ती आणि श्रावण महिन्याचे महत्त्व या दोन्ही पद्धतींमध्ये अगदी समान आहे. 

श्रावण महिन्याचे धार्मिक महत्व 

श्रावण महिना महादेवाला अत्यंत प्रिय मानला जातो. या काळात शिवभक्त मंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक, दूध, बेलपत्र, धोत्र्याचे फूल, भस्म आणि फुले अर्पण करतात. अनेकजण श्रावणातील सोमवारचे व्रत पाळतात, रूद्राभिषेक करतात आणि 'ॐ नमः शिवाय' या मंत्राचा जप करतात.  

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Shukra Gochar 2026 : ऑगस्ट महिन्याची सुरुवातच जबरदस्त...1 ऑगस्टला शुक्राचं संक्रमण; करिअर, नोकरी, प्रेम आणि आरोग्यावर कसा होणार परिणाम?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: देवघरात कवड्या का ठेवतात? देवी लक्ष्मीशी संबंध काय? पूजा कशी करतात? 'या' गोष्टींची काळजी घ्या, धार्मिक मान्यता सांगते...
देवघरात कवड्या का ठेवतात? देवी लक्ष्मीशी संबंध काय? पूजा कशी करतात? 'या' गोष्टींची काळजी घ्या, धार्मिक मान्यता सांगते...
Garud Puran: महिला स्मशानभूमीत का जात नाही? गरूडपुराणात काय म्हटलंय? लोकांची समजूत, शास्त्र काय सांगते...
महिला स्मशानभूमीत का जात नाही? गरूडपुराणात काय म्हटलंय? लोकांची समजूत, शास्त्र काय सांगते...
Baba Vanga: बाबा वेंगाची शेवटच्या 4 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! सप्टेंबर-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. तुमची रास?
बाबा वेंगाची शेवटच्या 4 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! सप्टेंबर-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. तुमची रास?
August 2026 Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनसाठी ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्याचा गेम पालटणार; पैसा, नोकरी, प्रेमात 'हे' बदल होणार
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनसाठी ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्याचा गेम पालटणार; पैसा, नोकरी, प्रेमात 'हे' बदल होणार
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
El Nino : El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Embed widget