Job Majha : लष्करात आणि गोव्यात सरकारी नोकरीची संधी; अर्ज कसा करणार, जाणून घ्या
Job Majha : नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
>> विद्युत विभाग, गोवा
पोस्ट - लाईन हेल्पर
शैक्षणिक पात्रता - इलेक्ट्रिकल लाईन्स बांधकामावर काम करण्याचा किमान २ वर्षांचा अनुभव, कोकणी भाषेचं ज्ञान असलेल्यांना प्राधान्य दिलं जाईल.
एकूण जागा - २५५
वयोमर्यादा - ४५ वर्षांपर्यंत
नोकरीचं ठिकाण - गोवा
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - ४ जुलै २०२२
तपशील - www.goaelectricity.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर whats new मध्ये Advertisement for post of line helpers ही लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
>> मुख्यालय दक्षिणी कमांड, पुणे
एकूण ३२ जागांसाठी भरती होत आहे.
सर्वाधिक जागा असलेल्या पोस्टविषयी आपण विस्ताराने माहिती जाणून घेऊयात.
पोस्ट - MTS (मेसेंजर)
शैक्षणिक पात्रता - मेट्रिक पास किंवा समतुल्य, १ वर्ष कामाचा अनुभव
एकूण जागा - १४
पोस्ट - LDC
शैक्षणिक पात्रता - १२वी पास, कम्प्युटरवर इंग्रजी टायपिंग ३५ श.प्र.मि., हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि.
एकूण जागा - ८
पोस्ट - MTS (सफाईवाला)
शैक्षणिक पात्रता - मेट्रिक पास, १ वर्षाचा कामाचा अनुभव
एकूण जागा - ५
या सोबतच स्टेनो ग्रेड -II, कुक, MTS draftary पदासाठी प्रत्येकी १ आणि MTS (चौकीदार) पदासाठी २ जागा आहेत. विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)
वयोमर्यादा - १८ ते २५ वर्ष
नोकरीचं ठिकाण - पुणे
ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करु शकता.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - १९ जुलै २०२२
तपशील - www.hqscrecruitment.com (या वेबसाईटवर गेल्यावर advertisement वर क्लिक करा. तुम्हाला थेट जाहिरात दिसेल. विस्ताराने माहिती मिळेल.)