SBI Bank Vacancy : सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) विविध विभागांमध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी भरती करत आहे. इच्छुक उमेदवार 31 मार्चपर्यंत अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात. यासाठी 4 मार्चपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार, या भरती प्रक्रियेद्वारे मुख्य माहिती अधिकार्यांचे एक पद, मुख्य तंत्रज्ञान अधिकार्यांचे एक पद आणि उपमुख्य तंत्रज्ञान अधिकार्यांच्या 2 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.
महत्वाची माहिती
ऑनलाइन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात : 4 मार्च 2022
ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2022
काय आहे पात्रता?
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर्सच्या पदांवर भरतीसाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून संबंधित विषयात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया कशी असेल ते जाणून घ्या
या पदांच्या भरतीसाठी उमेदवारांची निवड थेट मुलाखतीच्या आधारे केली जाईल. सर्व पात्र उमेदवारांनी SBI स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर भरती 2022 साठी बँकेच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अधिसूचनेचे संपूर्ण तपशील वाचावा.
वयोमर्यादा
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये डेप्युटी चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसरच्या पदावर भरतीसाठी उमेदवाराचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तसेच, इतर पदांसाठी कमाल वय 55 वर्षे इतके असावे. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवार अधिकृत अधिसूचना वाचू शकतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- ECGC PO 2022 Recruitment : प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी 75 जागांची भरती, ऑनलाइन अर्ज आजपासून सुरु, वाचा संपूर्ण माहिती
- Mumbai Metro : मुंबई मेट्रोत नोकरीची सुवर्णसंधी; दोन लाखापर्यंत मिळेल पगार, असा करा अर्ज
- Job Majha : 12वी पास आहात? सरकारी नोकरी शोधताय? लवकर करा अर्ज, मिळेल 80 हजारांपेक्षा जास्त पगार
- Job Majha : परीक्षा न देता सरकारी नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी, अर्जासाठी उरले दोन दिवस
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha