Government Jobs : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पाटणा उच्च न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी आहे. पाटणा उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर आणि कॉम्प्युटर ऑपरेटर इत्यादींसह अनेक पदांसाठी भरती निघाली आहे. 8 मार्चपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार पाटणा उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 159 पदांची भरती केली जाणार आहे.
महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 8 मार्च
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 मार्च
रिक्त जागा तपशील
या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 159 पदांसाठी भरती करण्यात येणार आहेत. ही पदे स्टेनोग्राफर आणि कॉम्प्युटर ऑपरेटर कम टायपिस्टची आहेत. स्टेनोग्राफर गट क ची 129 पदे आणि संगणक परिचालक सह टंकलेखक गट क ची 30 पदांसाठी भरती करण्यात येत आहेत.
अर्ज भरण्यासाठीचे शुल्क
UR/EWS/EBC/BC : 1000 रुपये
SC/ST/OH : 500 रुपये
पगार
तुमची पाटणा उच्च न्यायालयाच्या या पदांसाठी निवड झाल्यास उमेदवारांना 25,500 ते 81,100 रुपयांपर्यंत वेतन दिले जाईल.
अर्ज कसा करायचा?
उमेदवारांना या पदांबद्दल तपशीलवार माहिती हवी असल्यास तुम्ही पाटणा उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. उमेदवारांची निवड लेखी चाचणी, इंग्रजी शॉर्टहँड-संगणक टायपिंग चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
पात्रता आणि वयाची अट
पाटणा उच्च न्यायालयाच्या या पदांसाठीच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलताना, स्टेनोग्राफर पदांसाठी 12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात आणि पदवीधर उत्तीर्ण उमेदवार संगणक ऑपरेटर पदांसाठी अर्ज करू शकतात. यासाठी 18 ते 37 वर्षे वयोमर्यादा आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Job Majha : परीक्षा न देता सरकारी नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी, अर्जासाठी उरले दोन दिवस
- Job Majha: बँक ऑफ बडोदा आणि SIDBI मध्ये मोठी भरती सुरू; असा करा अर्ज
- नौदलात 1531 पदांसाठी बंपर भरती, प्रतिमाह 60 हजारांहून अधिक वेतन मिळवण्याची संधी, कसा कराल अर्ज?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha