Jobs in Mumbai Metro : MMRCL म्हणजेच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड काही पदांसाठी भरती करणार आहे. या भरतीअंतर्गत अभियांत्रिकी आणि इतर पदांच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार MMRCL चे अधिकृत संकेतस्थळ mmrcl.com वर ऑनलाइन अर्ज करू शकतील. 


या भरती अंतर्गत असलेल्या पदांसाठी इच्छुक उमेदवार 15 एप्रिल 2022 पर्यंत अर्ज करू शकतात. ही भरती 27 जागांसाठी केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 34 हजार ते 2 लाखपर्यंतच वेतन मिळू शकते. 


कोणत्या पदांवर होणार भरती



  • असिस्टंट जनरल मॅनेजर – 5 जागा

  • सहाय्यक व्यवस्थापक- 2 जागा

  • उपअभियंता - 2 जागा

  • कनिष्ठ पर्यवेक्षक – 1 जागा

  • कनिष्ठ अभियंता- 16 जागा

  • असिस्टंट (आयटी) - 1 जागा


भरतीबाबत माहिती


या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त आणि नामांकित विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये पूर्णवेळ पदवी असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी उमेदवारांची निवड वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे केली जाईल.


अर्ज कुठं पाठवावा ?


अर्ज करण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रांची माहिती घेऊन अर्ज करावा. इच्छुक पात्र उमेदवारांनी इतर आवश्यक कागदपत्रांसह भरलेला अर्ज डेप्युटी जनरल मॅनेजर (HR), मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, MMRCL-लाइन 3 ट्रान्झिट ऑफिस, ई ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई- 400051 येथे पाठवावा. 


 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha