ECGC PO 2022 Recruitment : ECGC ने त्यांच्या वेबसाईटवर (ecgc.in) प्रोबेशनरी ऑफिसर (Probationary Officer) पदाच्या भरतीसाठी रिक्त जागा अधिसूचित केल्या आहेत. अर्जदारांनी भरती प्रक्रियेसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. ECGC PO ऑनलाइन अर्ज 21 मार्च ते 20 एप्रिल 2022 पर्यंत उपलब्ध असेल.


भरती प्रक्रियेमध्ये ऑनलाइन परीक्षा असते जी 29 मे 2022 रोजी घेतली जाणार आहे. यासाठी 2022 मे च्या दरम्यान प्रवेशपत्र डाऊनलोड करता येऊ शकतील. जे उमेदवार ऑनलाइन परीक्षेत पात्र ठरतील त्यांना ऑनलाइन परीक्षेतील कामगिरीच्या आधारावर निवडलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुंबईतील कंपनीच्या इन-हाऊस पॅनेलद्वारे ही मुलाखत घेतली जाणार आहे. राखीव श्रेणीतील उमेदवार मे 2022 च्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी उपस्थित राहू शकतात.


ECGC PO भर्ती 2022 साठी अर्ज कसा करावा? 


1. ECGC वेबसाइट www.ecgc.in वर जा आणि “Career with ECGC” ही लिंक उघडण्यासाठी होम पेजवर क्लिक करा आणि त्यानंतर ऑनलाइन अर्ज उघडण्यासाठी “Click here to apply Online” या पर्यायावर क्लिक करा.


2. आता, ऑनलाइन अर्जामध्ये मूलभूत माहिती प्रविष्ट करून त्यांच्या अर्जाची नोंदणी करण्यासाठी “Click here for new registration" वर क्लिक करा. त्यानंतर, प्रणालीद्वारे एक तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल आणि स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल. तुम्ही प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड वापरून सेव्ह केलेला डेटा पुन्हा उघडू शकता आणि आवश्यक असल्यास तपशील संपादित करू शकता.


3. फोटो, सही, डाव्या अंगठ्याचा ठसा, कागदपत्रांच्या स्कॅनिंग आणि अपलोडसाठी मार्गदर्शक तत्त्वांमध्ये दिलेल्या वैशिष्ट्यांनुसार एक हस्तलिखित घोषणेसह अपलोड करा.


4. पेमेंट


ECGC PO अर्ज शुल्क :


जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस - रु. 850/-
SC/ST/PwD - रु. 175/-


ECGC PO पात्रता निकष :


शैक्षणिक पात्रता:


मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी


वयोमर्यादा : 


21 ते 30 वर्ष


ऑनलाइन परीक्षा - 200 गुण
मुलाखत - 60 गुण


महत्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha