Job Majha : दिल्ली विद्यापीठाने (Delhi University) सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) पदांसाठी भरती सुरु केली आहे. ही भरती श्री गुरु तेग बहादूर खालसा महाविद्यालयासाठी करण्यात येत आहे. अर्जासाठी फक्त दोन दिवस उरले असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. तुम्ही अधिकृत वेबसाइट colrec.du.ac.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकता. उमेदवारांना अधिकृत अधिसूचना सविस्तर वाचून घ्यावी.


दिल्ली विद्यापीठ भरती 2022 साठी महत्वाच्या तारखा
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 5 मार्च
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मार्च


दिल्ली विद्यापीठ भरती 2022 साठी रिक्त जागा तपशील
सहाय्यक प्राध्यापक : 66 पदे
इंग्रजी : 7 पदे
पंजाबी : 5 पदे
हिंदी : 3 पदे
अर्थशास्त्र : 4 पदे
इतिहास : 4 पदे
राज्यशास्त्र : 3 पदे
वाणिज्य : 11 पदे
गणित : 3 पदे
वनस्पतिशास्त्र : 6 पदे
रसायनशास्त्र : 2 पदे
इलेक्ट्रॉनिक्स : 2 पदे
संगणक विज्ञान : 5 पदे
भौतिकशास्त्र : 3 पदे
प्राणीशास्त्र : 6 पदे
पर्यावरण विज्ञान : 2 पदे


शैक्षणिक पात्रता
सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी 55 टक्के गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी. यासोबतच, अर्जदाराने UGC NET किंवा CSIR NET परीक्षेतही यशस्वी होणे आवश्यक आहे. अधिक तपशीलांसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध अधिसूचना वाचू शकतात.


अर्ज फी
दिल्ली विद्यापीठांतर्गत असिस्टंट प्रोफेसरच्या पदांवर भरतीसाठी अर्ज करणार्‍या सामान्य (Open), OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. अनुसूचित जाती, जमाती, दिव्यांग आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज विनामूल्य आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha