SSC Recruitment 2024 Notification : घाई करा! एसएससीतर्फे हजारो जागांसाठी पदभरती होणार, 'असा' करा अर्ज!
SSC Recruitment 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे तब्बल 8000 पेक्षा अधिक जागांसाठी पदभरती आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रियादेखील चालू झाली आहे.
SSC MTS Recruitment 2024 Notification : स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात एससीने मल्टिटास्किंग स्टाफ पदासाठी अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार एसएससी एकूण 8326 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवणार आहे. इच्छुक उमेदवारांना ssc.gov.in. या संकेतस्थळावर जाऊन 31 जुलैपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. एसएससीने जारी केलेल्या अधिसूचनेत एकूण पदे, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, परीक्षेची तारीख अशी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.
परीक्षा कधी होणार, तारीख काय? (SSC MTS Exam Date)
स्टाफ सिलेक्शन कमिशनने या पदभरतीसंदर्भात नुकतेच आपल्या ssc.gov.in. या अधिकृत संकेतस्थळावर अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवारांना या संकेतस्थळावर जाऊन नोटिफिकेशन डाऊनलोड करता येईल. SSC MTS परीक्षा 2024 सालातील ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आयोजित केली जाणार आहे. विशेष म्हणजे ही परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार आहे. लवकरच या परीक्षेची नेमकी तारीख जाहीर केली जाणार आहे.
निवड कशी होणार? (Selection Process of SSC MTS Exam)
स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे दरवर्षी मल्टि टास्किंग स्टाफ आणि हवालदार या पदांसाठी परीक्षांचे आयोजन केले जाते. यशस्वी परीक्षार्थींना नंतर सरकारच्या वेगवेगळ्या विभागांत नियुक्ती दिली जाते. लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे तसेच शारीरिक चाचणीतील (हवालदार पदासाठी) गुणांच्या आधारे तसेच कागदपत्रांची छाणणी करून उमेदवाराची निवड केली जाईल.
पगार किती मिळणार? (Salary for SSC MTS)
एसएससीतर्फे राबवल्या जाणाऱ्या या परीक्षेसाठी देशभरातील लाखो उमेदवार अर्ज करतात. सरकारी नोकर होण्याची संधी असल्यामुळे अर्जदारांची संख्याही चांगलीच मोठी असते. एमटीएस, हवालादर या पदासाठी आयोजित केली जाणारी ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर प्रतिमहिना साधारण 18,000 ते 22,000 रुपये पगार मिळतो. 8326 पदांपैकी 4887 जागा एमटीएस तर 3439 जागा या हवालदार पदासाठी असतील.
शैक्षणिक पात्रता काय? वयाची अट काय (SSC MTS Age Limit and Education)
एसएससीतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या या परीक्षेसाठी कमीत कमी इयत्ता 10 वीची परीक्षा उत्तीर्ण झालेली असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवार भारताचा रहिवासी असणे गरजेचे आहे. त्याचे वय हे 18 ते 25 आणि 18 ते 27 वर्षे यादरम्यान असणे गरजेचे आहे. ही एक राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा आहे.
हेही वाचा :
IAS, IPS होण्याचं स्वप्न होणार पूर्ण, सरकार देणार मोफत प्रशिक्षण, जाणून घ्या संपूर्ण माहिती
भारतातील तरुणांना जर्मनीत नोकरी करण्याची संधी, थेट ड्रायव्हर म्हणून मिळणार जॉब!