एक्स्प्लोर

RPF Recruitment 2024 : सरकारी नोकरीची संधी! आरपीएफमध्ये 2250 पदांवर भरती, सविस्तर माहिती वाचा

RPF Constable SI Recruitment 2024 : आरपीएफमध्ये 2250 रिक्त पदांवर भरती करण्यात येत आहे. 2 जानेवारीपासून या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

RPF Recruitment 2024 : रेल्वे संरक्षण दल (Railway Protection Force) म्हणजेच आरपीएफ (RPF) मध्ये बंपर भरती सुरु झाली आहे. आरपीएफने उपनिरीक्षक (Sub-Inspector) आणि हवालदार (Constable) पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. 2 जानेवारीपासून या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराने rpf.Indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज दाखल करावा.

आरपीएफमध्ये नोकरीची संधी

आरपीएफ 2024 भरतीअंतर्गत 2250 रिक्त जागांवर भरती करण्यात येत आहे. आरपीएफकडून रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि रेल्वे सुरक्षा विशेष बल (RPSF) यामध्ये उपनिरीक्षक (Sub-Inspector) आणि हवालदार (Constable) पदांवर भरती करण्यात येणार आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर लगेचच या भरतीसाठी अर्ज दाखल करा. या भरतीसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 पेक्षा जास्त असावे.

महत्त्वाची माहिती

रिक्त जागा : 2250 

अर्ज प्रक्रिया सुरु झाल्याची तारीख : 2 जानेवारी 2024

या भरती मोहिमेद्वारे रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि रेल्वे सुरक्षा विशेष बल (RPSF) मध्ये कॉन्स्टेबलच्या 2000 पदांवर भरती केली जाईल. तसेच उपनिरीक्षकांची 250 पदे भरली जाणार आहेत. त्यापैकी 10 टक्के पदे माजी सैनिकांसाठी आणि 15 टक्के महिला उमेदवारांसाठी आहेत. उमेदवार आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रियेशी संबंधित तपशील खाली तपासू शकतात.

RPF Constable SI Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

या भरती मोहिमेअंतर्गत, उपनिरीक्षक पदासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. तर हवालदार पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त मंडळातून दहावी उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे.

RPF Constable SI Recruitment 2024 : वयोमर्यादा

या भरती मोहिमेअंतर्गत उपनिरीक्षक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 20 वर्षे ते 25 वर्षे असणे आवश्यक आहे. तर, कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 18 वर्षे ते 25 वर्षे असणे आवश्यक आहे. दरम्यान, अर्ज करणाऱ्या उमेदवार राखीव प्रवर्गातील असल्यास त्याला नियमानुसार वयाच्या मर्यादेत सवलत मिळेल.

RPF Constable SI Recruitment 2024 : निवड कशी केली जाईल?

या पदांसाठी उमेदवारांची निवड संगणक आधारित चाचणी (CBT), शारीरिक चाचणी (PET) आणि कागदपत्र पडताळणीच्या आधारे केली जाईल. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटवरील माहिती वाचू शकतात.

सुशिक्षित बेरोजगारांपुढचा मोठा प्रश्न ओळखूनच एबीपी माझा तुमच्यासाठी घेऊन आलंय. जॉब माझा (Job Majha) विविध क्षेत्रातल्या नोकरीच्या संधी कुठे आहेत, कसं अप्लाय करायचं, कुठे संपर्क साधायचा याविषयीची माहिती देण्याचा आमचा हा एक प्रयत्न आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Jobs 2023 : नोकरीच्या शोधात आहात? मग 'ही' आहे कामाची बातमी, येथे करा अर्ज

महत्त्वाच्या बातम्या

नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget