नवीन वर्षात तरुणांना रेल्वेत नोकरीची मोठी संधी! 4200 पदांसाठी भरती सुरु, कसा कराल अर्ज? काय आहे पात्रता?
रेल्वेत नोकरीची करण्याची इच्छा असेल तर त्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. रेल्वेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.
Railway Recruitment: रेल्वेत नोकरीची करण्याची इच्छा असेल तर त्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. रेल्वेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. जर तुम्ही 10वी पास असाल आणि तुमच्याकडे ITI प्रमाणपत्र असेल, तर भारतीय रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. दक्षिण मध्य रेल्वेने 4232 शिकाऊ पदांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून 27 जानेवारी 2025 पर्यंत सुरु राहणार आहे.
या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु
इच्छुक उमेदवार रेल्वे रिक्रूटमेंट सेल scr.indianrailways.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या भरतीअंतर्गत वेगवेगळ्या ट्रेडमध्ये नियुक्त्या केल्या जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, मशिनिस्ट, डिझेल मेकॅनिक, एसी मेकॅनिक, पेंटर आणि इतर व्यवसायांचा समावेश आहे. जास्तीत जास्त 1053 पदे इलेक्ट्रिशियन आणि 1742 पदे फिटरसाठी आहेत. या भरतीअंतर्गत AC मेकॅनिकच्या 143 जागा, वेल्डरच्या 713 जागा, डिझेल मेकॅनिकच्या 142 जागा, पेंटरच्या 74 जागा आणि इतर ट्रेडसाठी पदे आहेत.
आवश्यक पात्रता काय?
शिकाऊ पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. यासोबतच संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वयाची मर्यादा काय?
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 15 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तर अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय 24 वर्षे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत दिली जाईल.
अर्ज करण्यासाठी किती फी?
या भरती मोहिमेसाठी, उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. सामान्य/ओबीसी श्रेणीतील उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल. तर SC/ST/PWBD/महिला उमेदवारांना फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.