एक्स्प्लोर

Rickshaw License : मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांचे लायसन्स रद्द होण्याची शक्यता, फेरतपासणीचे सरकारचे आदेश

Rickshaw License Verification : रिक्षा परवाने आणि बॅच वितरणातील गैरप्रकारांच्या तक्रारीनंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून मराठी न येणाऱ्या चालकांवरही कारवाईची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मुंबई : रिक्षाचालकांबाबत वाढत्या तक्रारी आणि परवाना प्रक्रियेत होत असलेल्या कथित गैरप्रकारांनंतर राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये आलं आहे. मीरा-भाईंदर परिसरात बोगस कागदपत्रांच्या आधारे रिक्षा आणि टॅक्सी परवाने मिळाल्याच्या तक्रारींनंतर आता परवान्यांची सखोल फेरतपासणी केली जाणार आहे. या परवाना फेरतपासणी दरम्यान रिक्षा चालकांना मराठी येते का, याचीही कसून पडताळणी केली जाणार आहे. तर मराठी बोलता न येणाऱ्या चालकांवर परवाना रद्द करण्याची कारवाई होण्याची शक्यता आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत कडक निर्देश दिले असून 1 मेपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Rickshaw License Scam : बोगस कागदपत्रांवर परवाने

भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी केलेल्या तक्रारीनंतर हा मुद्दा पुढे आला. काही परप्रांतीय आणि परदेशी नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या संगनमताने बनावट कागदपत्रांच्या आधारे रहिवासी दाखले मिळवून रिक्षा आणि टॅक्सी परवाने मिळवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने ही बाब अत्यंत गंभीर मानत प्रत्येक प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Marathi Language Rule : मराठी येणं अनिवार्य

मोटार परिवहन विभागाच्या नियमांनुसार रिक्षाचालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य आहे. त्यामुळे फेरतपासणीदरम्यान चालकांना मराठी येते का, याचीही कसून पडताळणी केली जाणार आहे. मराठी बोलता न येणाऱ्या चालकांवर परवाना रद्द करण्याची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Action Against Officers : अधिकाऱ्यांवरही कारवाईचे संकेत

फक्त चालकांवरच नव्हे तर चुकीच्या पद्धतीने परवाने देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार असल्याचे स्पष्ट संकेत मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. ऑनलाइन प्रक्रिया असतानाही बोगस कागदपत्रांच्या आधारे परवाने दिल्याच्या तक्रारी गंभीर मानल्या जात आहेत.

Special Drive Mira Bhayandar : विशेष मोहिम राबवणार

मीरा-भाईंदर परिसरात मागील 10 वर्षांत दिलेल्या सर्व रिक्षा परवान्यांची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. महिनाभराचा विशेष कॅम्प आयोजित केला जाणार असून प्रत्येक कागदपत्राची बारकाईने छाननी केली जाणार आहे. आवश्यकतेनुसार अतिरिक्त मनुष्यबळही तैनात करण्यात येणार आहे.

Security Concern : शहराच्या सुरक्षेचा मुद्दा

बोगस कागदपत्रांच्या आधारे परवाने मिळाल्यास शहराच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असं नमूद करत या प्रकरणात कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत रिक्षा परवाना प्रक्रियेत मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र महसूल व वन विभागात नोकरीचे आमिष, युवकाची तब्बल 70 लाखांची फसवणूक, तीन आरोपींना अटक 
महाराष्ट्र महसूल व वन विभागात नोकरीचे आमिष, युवकाची तब्बल 70 लाखांची फसवणूक, तीन आरोपींना अटक 
मुंबई - नाशिक महामार्गावर धक्कादायक घटना, पार्किंग केलेल्या एका ट्रकमध्येच आढळला चालकाचा मृतदेह 
मुंबई - नाशिक महामार्गावर धक्कादायक घटना, पार्किंग केलेल्या एका ट्रकमध्येच आढळला चालकाचा मृतदेह 
Kalyan Court Summons Uddhav Thackeray And Eknath Shinde: उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदेंनाही कल्याण कोर्टाने समन्स धाडलं; दोघांनाही हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदेंनाही कल्याण कोर्टाने समन्स धाडलं; दोघांनाही हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
Mira Bhayandar Crime News: साखरपुड्याला जाण्यावरून पती-पत्नीमध्ये तुफान राडा; भांडण सोडवायला गेला अन् मुलाचा नाहक बळी गेला, मिरा-भाईंदरमध्ये नेमकं काय घडलं?
साखरपुड्याला जाण्यावरून पती-पत्नीमध्ये तुफान राडा; भांडण सोडवायला गेला अन् मुलाचा नाहक बळी गेला, मिरा-भाईंदरमध्ये नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी

'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
Shivsena :शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळातून फाईल गायब झाल्यानं शिवसेना आक्रमक
शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळाबाहेर घोषणाबाजी 
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
Gunratna Sadavarte : आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ
अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ
Pune Crime News: बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
Embed widget