एक्स्प्लोर

रेल्वेत 64 हजार पदांसाठी भरती, तब्बल 1 कोटी 87 लाख उमेदवारांनी केले अर्ज, एका पदासाठी 291 दावेदार   

Railway Job News : 2024 मध्ये रेल्वेने 64197 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आणि देशभरातून 1.87 कोटी लोकांनी या पदांसाठी अर्ज आले होते.

Railway Job News :  रेल्वेमध्ये नोकरी (Railway Job) मिळवा हे कोट्यवधी तरुणांचे स्वप्न असते. परंतू संसदेत सादर केलेल्या ताज्या आकडेवारीवरून हे स्वप्न पूर्ण करणे किती कठीण आहे याची कल्पना येते. 2024 मध्ये, रेल्वेने 64197 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आणि देशभरातून 1.87 कोटी लोकांनी या पदांसाठी अर्ज केले. म्हणजेच सरासरी एका पदासाठी सुमारे 291 उमेदवारांनी आपले नशीब आजमावले.

रेल्वे (Railway) मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून असे दिसून येते की काही पदांसाठी स्पर्धा आश्चर्यकारक होती. उदाहरणार्थ, आरपीएफ कॉन्स्टेबलच्या 4208 पदांसाठी सुमारे 45.3 लाख अर्ज प्राप्त झाले. याचा अर्थ असा की प्रत्येक पदासाठी सुमारे 1076 उमेदवार रांगेत होते. तंत्रज्ञांच्या 14298 पदांसाठी सुमारे 26.99 लाख लोकांनी फॉर्म भरला, तर असिस्टंट लोको पायलट म्हणजेच एएलपीच्या 18799 पदांसाठी 18.4 लाख उमेदवारांनी अर्ज केले. एनटीपीसी श्रेणीतील लोकप्रिय पदांसाठीही प्रत्येक पदासाठी 700 हून अधिक उमेदवार होते.

भरती प्रक्रिया कुठे होती?

भरती प्रक्रियेची व्याप्ती देखील मोठी होती. मंत्रालयाच्या मते, सध्या 92116 पदांसाठी निवड प्रक्रिया सुरू आहे. यापैकी 55197 पदांसाठी संगणक आधारित चाचणी (सीबीटी) घेण्यात आली आहे. या परीक्षा देशातील 150 हून अधिक शहरांमध्ये आणि 15 भाषांमध्ये घेण्यात आल्या. एएलपी, आरपीएफ एसआय, कॉन्स्टेबल, कनिष्ठ अभियंता आणि सीएमए सारख्या अनेक पदांचे निकालही जाहीर झाले आहेत.

रेल्वे विभागात येत्या काही महिन्यात उर्वरित रिक्त जागाही भरल्या जाणार 

तंत्रज्ञ भरतीमध्येही वेगाने काम सुरू आहे. एकूण 14298 पदांपैकी 9000 हून अधिक उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. येत्या काही महिन्यांत उर्वरित रिक्त जागाही भरल्या जातील असे मंत्रालयाचे म्हणणे आहे. रेल्वेने 2025 साठी मोठ्या प्रमाणात भरतीची योजना आखली आहे. मार्च 2026 मध्ये, CEN 01/2025  अंतर्गत सुमारे 9970 ALP पदांसाठी अर्ज मागवले जातील, तर जूनमध्ये, CEN 02/2025 अंतर्गत 6238 तंत्रज्ञ पदांची भरती केली जाईल.

आकडेवारी काय सांगते?

गेल्या 20 वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, सुधारणा स्पष्टपणे दिसून येते. 2004 ते 2014 दरम्यान, रेल्वेने 4.11 लाख कर्मचाऱ्यांची भरती केली, तर 2014 ते 2025दरम्यान ही संख्या 5.08 लाखांपर्यंत वाढली. म्हणजेच सुमारे एक लाख अधिक नियुक्त्या करण्यात आल्या. अहवालांनुसार, वार्षिक भरती कॅलेंडर, पूर्णपणे डिजिटल परीक्षा प्रणाली आणि अनेक भाषांमध्ये परीक्षा आयोजित करणे यासारख्या पायऱ्यांमुळे ही सुधारणा शक्य झाली.

महत्वाच्या बातम्या:

ESIC Recruitment 2025 : 2 लाखापर्यंत पगार, सरकारी नोकरीची मोठी संधी, ESIC मध्ये असिस्टंट प्रोफेसरपदाची भरती

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report
Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
BMC Election 2026: मुंबईत राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा फायदा होणार नाही कारण...; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली भाजपची ती थिअरी
मुंबईत राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा फायदा होणार नाही कारण...; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली भाजपची ती थिअरी
Jay Dudhane First Reaction After Arrested: मी हनिमूनसाठी जात होतो आणि...; अटकेनंतर जय दुधाणे नेमकं काय म्हणाला?
मी हनिमूनसाठी जात होतो आणि...; अटकेनंतर जय दुधाणे नेमकं काय म्हणाला?
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
Embed widget