खूशखबर, दहावी पास उमेदवारांसाठी भारतीय रेल्वेची बंपर भरती, 9 हजारांहून अधिक जागा, आजच अर्ज करा!
Indian Railway Recruitment: भारतीय रेल्वेकडून बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे. जर तुम्हीही रेल्वेच्या नोकरीची वाट पाहत असाल, तर आजचा दिवस तुमच्यासाठी शेवटचा दिवस आहे. मध्य रेल्वेच्या 9 हजार पदांसाठी अर्ज करण्याची आजची शेवटची तारीख आहे.
Railway Recruitment: नवी दिल्ली : आजही प्रत्येक तरुणाची पहिली पसंती सरकारी नोकरीलाच असते. आजही शहरांसह खेड्यापाड्यांत सरकारी नोकरी म्हटलं की, लग्नासाठी स्थळांची रांग लागते. मग ती मुलगा असो वा मुलगी. सरकारी नोकरी अन् बक्कळ पगार असं समीकरणंच सर्वांच्या मनात तयार झालेलं आहे. तुम्हीही त्याच तरुणांच्या रांगेत असाल आणि सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत असाल, तर तुमच्यासाठी नामी संधी आहे. भारतीय रेल्वेकडून (Indian Railway) बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे. जर तुम्हीही रेल्वेच्या नोकरीची वाट पाहत असाल, तर आजचा दिवस तुमच्यासाठी शेवटचा दिवस आहे. मध्य रेल्वेच्या 9 हजार पदांसाठी अर्ज करण्याची आजची शेवटची तारीख आहे. मध्य रेल्वेनं टेक्निशियनच्या एकूण 9144 पदांची भरती केली आहे. जर तुम्ही अद्याप या भरतीसाठी अर्ज केला नसेल आणि अर्ज करू इच्छित असाल तर, रेल्वेची अधिकृत वेबसाईट recruitmentrrb.in वर जाऊन विलंब न करता अर्ज करा. तुम्हाला रेल्वे भरती 2024 साठीचा अर्ज आज रात्री 11.59 वाजेपर्यंत भरता येईल. त्यामुळे आजचा एक दिवस तुमच्या हातात आहे, संधी सोडू नका.
Railway Recruitment 2024 : रिक्त जागांचा तपशील
रेल्वे भरती 2024 मोहिमेद्वारे टेक्निशियनची एकूण 9144 पदं भरण्यात येणार आहेत. यामध्ये टेक्निशियन ग्रेड I सिग्नलच्या 1092 पदं, टेक्निशियन ग्रेड III सिग्नलच्या 8052 पदांचा समावेश आहे.
Railway Recruitment 2024 : कोणाला करता येणार अर्ज?
भारतीय रेल्वेनं जारी केलेल्या या भरतीसाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल, तर उमेदवारानं मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाकडून दहावी किंवा समकक्ष पात्रता उत्तीर्ण केलेली असावी. यासोबतच उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रातील आयटीआय प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे.
Railway Recruitment 2024 : वयोमर्यादा
टेक्निशियन ग्रेड I सिग्नल या पदासाठी उमेदवाराचे वय 18 ते 36 वर्ष असावं. तर टेक्निशियन ग्रेड III सिग्नलच्या पदासाठी उमेदवाराचे वय 18 ते 33 वर्ष असणं आवश्यक आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार, कमाल वयोमर्यादेत सूट मिळेल.
Railway Recruitment 2024: कशी केली जाईल निवड?
भारतीय रेल्वेनं भरती प्रक्रियेतंर्गत जारी केलेल्या जागांसाठी उमेदवारांना सीबीटी वन आणि सीबीटी टू परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलं जाईल.
Railway Recruitment 2024 : अर्ज शुल्क
रेल्वे भरती 2024 साठी अर्ज करण्यासाठी, सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क भरावं लागेल. तर राखीव प्रवर्ग, महिला आणि अपंग प्रवर्गातील उमेदवारांना फक्त 250 रुपये भरावे लागतील. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना अर्जाची फी ऑनलाईन पद्धतीनं भरावी लागेल.