Paytm Lay Off: नवं वर्ष सुरू होण्यापूर्वी पेटीएममध्ये भूकंप; हजारहून अधिक लोकांना नारळ, कारण काय?
Paytm Lays Off: ऑनलाईन पेमेंट सेवा देणाऱ्या पेटीएम (Paytm) या दिग्गज कंपनीच्या व्यवस्थापनानं नवं वर्ष सुरू होण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे.
Paytm Lays Off Over 1000 Employees: 2023 वर्ष संपायला फक्त 6 दिवस उरले आहेत आणि नवीन वर्षाच्या म्हणजेच, 2024 च्या (New Year 2024) स्वागतासाठी केवळ देशच नाहीतर, संपूर्ण देश सज्ज झाला आहे. अनेक छोट्या-मोठ्या कंपन्यांमध्ये नव्या वर्षाच्या जल्लोषाचं वातावरण आहे, मात्र ऑनलाईन पेमेंट सेवा देणाऱ्या पेटीएम (Paytm) या दिग्गज कंपनीच्या व्यवस्थापनानं नवं वर्ष सुरू होण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. दरम्यान, पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्सनं (One 97 Communications) 1000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं आहे.
कॉस्ट कटिंगचा उल्लेख
बिझनेस टुडेवर प्रकाशित झालेल्या ईकोनॉमिक टाईम्सच्या अहवालात असं नमूद केलं आहे की, 2023 वर्ष संपण्यापूर्वीच पेटीएमनं मोठी नोकरकपात केली आहे. पेटीएमनं (Paytm Lay Off) कर्मचाऱ्यांना मोठा दणका देत, एका झटक्यात एक हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. Paytm नं खर्चात कपात आणि व्यवसाय सुव्यवस्थित करण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून ही मोठी टाळेबंदी केली आहे. यासोबतच आगामी काळात असे आणखी निर्णय घेतले जाण्याची शक्यताही कंपनीनं वर्तवली आहे. अहवालानुसार, गेल्या काही महिन्यांत अशा अनेक नोकर कपातीच्या बातम्या समोर आल्या आहेत.
Paytm च्या इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा बोझा वाढणार
विजय शेखर शर्मा यांच्या पेटीएम कंपनीमध्ये घेण्यात आलेल्या नोकर कपातीच्या निर्णयामुळे पेटीएमच्या सुमारे 10 टक्के कर्मचाऱ्यांवर परिणाम झाला आहे. अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर नोकर कपात केलेल्या मोठ्या फिनटेक कंपन्यांच्या यादीत आता पेटीएमच्या नावाचा समावेश झाला आहे. रिपोर्टनुसार, पेटीएममधील या टाळेबंदीमुळे कंपनीच्या कर्ज व्यवसायाशी संबंधित विभाग सर्वाधिक प्रभावित झाला आहे.
...म्हणून घेतला नोकरकपातीचा निर्णय
कंपनीच्या प्रवक्त्यांनी पेटीएममधील नोकरकपातीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच, याबाबत बोलताना सांगितलं की, "पेटीएम चालू आर्थिक वर्षात कर्मचार्यांच्या खर्चात 10 ते 15 टक्के कपात करण्याचं उद्दिष्ट ठेवत आहे. ते म्हणाले की, टाळेबंदीमुळे प्रभावित झालेल्या बहुतेक पोस्ट अशा आहेत ज्यांची जागा AI नं घेतली आहे. दरम्यान, या नोकरकपातीबद्दल स्पष्टीकरण देताना, प्रवक्त्यांनी असंही म्हटलं आहे की, Paytm Payment Business मधील कर्मचार्यांची संख्या येत्या वर्षात 15,000 नं वाढविली जाऊ शकते.
नव्या बिझनेसवर कंपनीचा फोकस
रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, पेटीएम आता आपल्या वेल्थ मॅनेजमेंट वर्टिकलसाठी नव्या प्रोडक्ट्सवर फोकस करत आहे. कंपनीची पुढच्या काळातील योजना इंश्योरन्स डिस्ट्रीब्यूशन मार्केटमध्ये जागा तयार करण्याचीही आहे. पेटीएमच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, या संदर्भात पेटीएम (Paytm) एआय ऑटोमेशनसह (AI Automation) आपल्या कामाच्या पद्धतीत बदल करत आहे.