एक्स्प्लोर

Job Majha: LIC मध्ये 9394 जागांसाठी बंपर भरती सुरू, आजच करा अर्ज 

LIC ADO Recruitment 2023 Notification: एलआयसीमध्ये अप्रेंटिस डेव्हलपमेंट ऑफिसरच्या नऊ हजाराहून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. 

नवी दिल्ली: लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) एलआयसीने अप्रेंटिस डेव्हलपमेंट ऑफिसरच्या पदांसाठी बंपर भरतीची (LIC ADO Recruitment 2023 Notification) घोषणा केली आहे. त्यासंबंधित नोटीफिकेशन जारी करण्यात आलं असून LIC ADO (अप्रेंटिस डेव्हलपमेंट ऑफिसर्स) या पदासाठी 9394 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी LIC च्या अधिकृत वेबसाइट licindia.in ला भेट द्यावी.

LIC ADO भरतीसाठी ऑनलाइन अर्ज 21 जानेवारीपासून सुरू झाले आहेत. यासाठी पात्र उमेदवार 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेतत दक्षिण विभागीय कार्यालय, दक्षिण-मध्य विभागीय कार्यालय, उत्तर-मध्य विभागीय कार्यालय, मध्य-विभागीय कार्यालयासह विविध विभागीय कार्यालयांमध्ये 9 हजारांहून अधिक रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

एलआयसी भरती 2023: महत्त्वाच्या तारखा

- ऑनलाइन अर्जाची सुरुवात: 21 जानेवारी 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2023
- कॉल लेटर डाउनलोड: 4 मार्च 2023
- प्राथमिक परीक्षेची तारीख: 12 मार्च 2023
- मुख्य परीक्षेची तारीख: 8 एप्रिल 2023

LIC Vacancy 2023: या रिक्त पदांचे तपशील पहा

- दक्षिण विभागीय कार्यालय: 1516 पदे
- दक्षिण मध्य विभागीय कार्यालय: 1408 पदे
- उत्तर विभागीय कार्यालय: 1216 पदे
- उत्तर विभागीय कार्यालय: 1216 पदे
- उत्तर मध्य विभागीय कार्यालय: 1033 पदे
- पूर्व विभागीय कार्यालय: 1049 पदे
- पूर्व मध्य विभागीय कार्यालय: 669 पदे
- मध्य विभागीय कार्यालय: 561 पदे
- पश्चिम विभागीय कार्यालय: 1942 पदे

एकूण रिक्त पदांची संख्या - 9394 पदे

कोण अर्ज करू शकतो?

एलआयसीच्या या भरतीसाठी (LIC ADO Recruitment 2023 Notification) अर्ज करण्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे. याशिवाय तीन ते पाच वर्षांचा अनुभव असण्याची आवश्यकता आहे. उमेदवाराची वयोमर्यादा 21 ते 30 वर्षे दरम्यान असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. शैक्षणिक पात्रता आणि मर्यादेबद्दल अधिक तपशीलांसाठी, सूचना काळजीपूर्वक वाचा.

LIC ADO Recruitment 2023 Notification: निवड प्रक्रिया कशी असेल?

या पदांसाठी निवड पहिला ऑनलाईन चाचणी आणि त्यानंतर त्या उमेदवारांच्या मुलाखतीच्या आधारे केली जाईल. ऑनलाईन चाचणी आणि मुलाखतीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना भरतीपूर्व वैद्यकीय चाचणीसाठी बोलावले जाईल.

अर्जासाठी फी किती?

खुल्या गटातील उमेदवारांसाठी 750 रुपये तर अनुसूचित जाती, जमातीच्या उमेदवारांसाठी 100 रुपये फी आहे. ही फी ऑनलाईन पद्धतीने भरता येऊ शकेल. 

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Team India : टीम इंडियाला आणखी एक धक्का,तिलक वर्मानंतर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह
टीम इंडियाला धक्का,तिलक वर्मानंतर आणखी एक खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Team India : टीम इंडियाला आणखी एक धक्का,तिलक वर्मानंतर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह
टीम इंडियाला धक्का,तिलक वर्मानंतर आणखी एक खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
Shankar Jagtap : शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
Embed widget