इंजिनियरींगच्या तरुणांसाठी सरकारी नोकरी संधी, 'ही' आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख
इंजिनियरींगच्या (Engineer) तरुणांसाठी सरकारी नोकरीची (Govt Job) संधी आली आहे. पात्र असलेले उमेदवार या जागांसाठी अर्ज करु शकतात.
DPCC Recruitment 2023 : इंजिनियरींगच्या (Engineer) तरुणांसाठी सरकारी नोकरीची (Govt Job) संधी आली आहे. दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने सहाय्यक पर्यावरण अभियंता (Assistant Environmental Engineer) पदासाठी अर्ज मागवले आहेत. या रिक्त पदांसाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज पाठवू शकता. तुम्ही सरकारी नोकरी शोधत असाल आणि तुमच्याकडे आवश्यक पात्रता असल्यास, तुम्ही DPCC मध्ये या पदांसाठी फॉर्म भरू शकता.
रिक्त जागा या सहाय्यक पर्यावरण अभियंत्यासाठी आहेत. UPSC परीक्षेत निवड न झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. UPSC द्वारे घेतलेल्या अभियांत्रिकी सेवा परीक्षेचे शिफारस केले नसलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. अर्ज भरण्यासाठी DPCC च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. dpcc.delhigovt.nic.in. येथून तुम्ही तपशील जाणून घेऊ शकता आणि अर्जही करु शकता.
अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?
जाहीरातीत दिलेल्या माहितीनुसार, DPCC च्या सहाय्यक पर्यावरण अभियंता पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 डिसेंबर 2023 आहे. या तारखेपूर्वी विहित नमुन्यात फॉर्म भरु शकता. तुम्ही ऑनलाईन अर्ज केल्यानंतरही तुम्हाला ऑफलाईन अर्ज देखील पाठवावे लागतील. या अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायला विसरु नका
अर्ज पाठवण्याचा पत्ता
प्रशासकीय शाखा, दिल्ली प्रदूषण नियंत्रण समिती, 4था आणि 5वा मजला, ISBT बिल्डिंग, काश्मिरी गेट, दिल्ली - 06.
किती मिळेल पगार?
पात्रता आणि वयोमर्यादेबद्दल तपशीलवार माहिती मिळवण्यासाठी, अधिकृत वेबसाइटवर दिलेली सूचना तपासा. या भरती मोहिमेद्वारे एकूण 38 पदे भरण्यात येणार आहेत. निवड झाल्यास दरमहा तुम्हाला 39 हजार रुपयांपर्यंत वेतन मिळते. ही पूर्णवेळ नोकरी आहे. या नोकरीचे ठइकाण हे दिल्ली असेल. वर नमूद केलेल्या वेबसाइटवरील इतर तपशील आणि अपडेट्स वेळोवेळी तपासत रहा.
महत्त्वाच्या बातम्या: