Job Market Growth : विविध क्षेत्रात निघाल्या नोकऱ्या, बेरोजगारांना मिळणार संधी, जॉब मार्केटमध्ये 18 टक्क्यांनी वाढ
Job Market Growth : कोरोनाचा प्रभाव कमी होताच देशाची अर्थव्यवस्था हळूहळू रुळावर येत आहे.
Job Market Growth : विविध क्षेत्रात निघाल्या नोकऱ्या, बेरोजगारांना मिळणार संधी, जॉब मार्केटमध्ये 18 टक्क्यांनी वाढ
Job Market Growth : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा (Corona Third Wave) प्रभाव आता कमी झाला आहे. कोरोनाचा प्रभाव कमी होताच देशाची अर्थव्यवस्था हळूहळू रुळावर येत आहे. एम्प्लॉयमेंट मार्केटबद्दल बोलायचे झाले तर मार्चमध्ये वर्षभरापूर्वीच्या तुलनेत 18.4 टक्के वाढ झाली आहे.
टुरिझम आणि हॉटेल क्षेत्रात 48 टक्के वाढ
Allsec Technologies च्या अहवालानुसार, मार्च 2022 मध्ये प्रवास आणि ऊर्जा क्षेत्रांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे नोकरीचा बाजार खूप चांगला राहिला आहे. प्रवास आणि हॉटेल क्षेत्राने वर्षभरापूर्वीच्या तुलनेत या महिन्यात हायरिंगच्या बाबतीत 47.6 टक्के वाढ नोंदवली आहे.
दोन वर्षात सर्वाधिक फटका हॉटेल उद्योगाला
ट्रॅव्हल आणि हॉटेल क्षेत्रातील रोजगाराच्या संख्येत झालेली वाढ कोविड-19 महामारीमुळे प्रभावित झालेल्या या क्षेत्रांची स्थिती सुधारते आहे. गेल्या दोन वर्षांत, प्रवास आणि हॉटेल उद्योगाला साथीच्या रोगाचा सर्वाधिक फटका बसला आहे.
नोकऱ्यांमध्ये वाढ
हा अहवाल Allsec Technologies कडून मिळवलेल्या डेटावर आधारित आहे, जो सर्व क्षेत्रातील रोजगार ट्रेंडचा मागोवा घेतो. अहवालात असे म्हटले आहे की गेल्या वर्षीच्या तुलनेत नोकऱ्यांमधील बदल सकारात्मक झाला आहे आणि अनेक क्षेत्रांनी भरतीच्या संख्येत प्रगती दर्शविली आहे.
दोन्ही क्षेत्रे आता पुनरुज्जीवनाच्या मार्गावर
महामारीपूर्वीच्या डेटाशी तुलना केल्यास असे दिसून येते की, या दोन्ही क्षेत्रांनी मार्च 2020 च्या तुलनेत मार्च 2022 मध्ये 24.3 टक्के वाढ दर्शविली आहे. असे असूनही ही दोन्ही क्षेत्रे आता पुनरुज्जीवनाच्या मार्गावर आहेत, असे म्हणता येईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Railway Recruitment 2022 : रेल्वेत मेगा भरती, 2 हजारांहून अधिक रिक्त पदं, 10वी पास उमेदवारांना करता येणार अर्ज
- Job Majha : कल्याण डोंबिवली महानगरपालिका,पंजाब नॅशनल बँकेमध्ये नोकरीची संधी, आजच करा अर्ज