कोकण रेल्वेमध्ये नोकरीची संधी, अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या
नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. सध्या कोकण रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी कधीपर्यंत अर्ज करु शकाल ते सविस्तर जाणून घेऊयात.
Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या (Job Majha) शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'नं (Abp Majha) पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे, याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी (Job Majha) या ठिकाणी अर्ज करु शकतील. सध्या कोकण रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी कधीपर्यंत अर्ज करु शकाल ते सविस्तर जाणून घेऊयात.
कोकण रेल्वे
ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (Mechanical)
- शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा
- एकूण जागा - 10
- वयाची अट: 35 वर्षांपर्यंत
- थेट मुलाखत: 3 आणि 8 ऑक्टोबर 2024
- अधिकृत वेबसाईट- konkanrailway.com
टेक्निशियन (Mechanical)
- शैक्षणिक पात्रता :- ITI
- एकूण जागा - 23
- वयाची अट: 35 वर्षांपर्यंत
- थेट मुलाखत: 3 आणि 8 ऑक्टोबर 2024
- अधिकृत वेबसाईट- konkanrailway.com
MPSC मार्फत भरती
पोलीस उपनिरीक्षक
- शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा १२वी उत्तीर्ण
- एकूण जागा - 615
- वयाची अट: 35 वर्षांपर्यंत
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 7 ऑक्टोबर 2024
- अधिकृत वेबसाईट - mpsc.gov.in
कोणती पदे भरली जाणार?
कोकण रेल्वे भरती अंतर्गत एकूण 190 पदे भरली जाणार आहेत. रेल्वेच्या विविध विभागात ही भरती केली जाणार आहे. यामध्ये वरिष्ठ विभाग अभियंता, तंत्रज्ञ, असिस्टंट लोको पायलट, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, कमर्शियल पर्यवेक्षक, ट्रॅक मेंटेनर आणि पॉइंट मॅन या पदांचा समावेश आहे. या पदांसाठी फक्त गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील मूळ रहिवासी अर्ज करु शकणार आहेत. ज्या उमेदवारांनी आपली जमीन गमावली आहे किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य जे कोकण रेल्वेचे कर्मचारी आहेत ते देखील फॉर्म भरू शकतात.
अर्ज करण्याची अतिम तारीख 6 ऑक्टोबर 2024
16 सप्टेंबर 2024 पासून सुरू अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 6 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 11:59 पर्यंत फॉर्म भरता येईल. असे असले तरी उमेदवारांनी शेवटच्या क्षणापर्यंत थांबू नये आणि वेळेआधी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हे ही वाचा :
जलसंपदा पंप स्टोरेज क्षेत्रात तीन मोठे करार, 82 हजार कोटींची गुंतवणूक आणि 18 हजार जणांना रोजगार मिळणार