Job Majha : मुंबई महानगरपालिका आणि सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पदांसाठी भरती, 'असा' करा अर्ज
Job Majha :
Job Majha : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड चंद्रपूर, मुंबई महानगरपालिका, सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय आणि एसटी महामंडळ जालना येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांनी या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड चंद्रपूर (SAIL)
पोस्ट : वरिष्ठ सल्लागार, सल्लागार, वैद्यकीय अधिकारी, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, खाण फोरमॅन, सर्वेक्षक, ऑपरेटर कम टेक्निशियन, मायनिंग मेट, अटेंडंट कम टेक्निशियन, फायरमन.
शैक्षणिक पात्रता : DM/DNB,MBBS, पदव्युत्तर पदवी, BE / B.Tech (विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)
एकूण जागा : 259
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 डिसेंबर 2022
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
नोकरीचं ठिकाण : चंद्रपूर
अधिकृत वेबसाईट : www.sailcareers.com
मुंबई महानगरपालिका
पोस्ट : प्रशिक्षित कर्मचारी परिचारिका
शैक्षणिक पात्रता : GNM नर्सिंग
एकूण जागा : 118
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 डिसेंबर 2022
अर्ज पाठवण्याचा पत्ता : परिचारिका आस्थापना कक्ष, लोकमान्य टिळक महानगरपालिका सामान्य रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, सायन (पश्चिम), मुंबई –400022
मुलाखतीची तारीख : 13 आणि 14 डिसेंबर 2022
मुलाखतीचा पत्ता : अधिष्ठाता कार्यालय, लोकमान्य टिळक रुग्णालय, शीव, मुंबई – 400022
तपशील : portal.mcgm.gov.in
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय
पोस्ट : विशेष सहाय्यक सरकारी वकील
शैक्षणिक पात्रता : कायद्याची पदवी
एकूण जागा : 28
नोकरीचं ठिकाण : सोलापूर
अर्ज पाठवण्याचा पत्ता : दुय्यम चिटणीस शाखा, जिल्हादंडाधिकारी सोलापूर
ऑफलाईन पद्धतीने तु्म्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 डिसेंबर 2022
तपशील : solapur.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर सूचनामध्ये भरतीवर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
एसटी महामंडळ, जालना
पोस्ट : इंजिनिअर, मेकॅनिकल मोटार वेहिकल, इलेक्ट्रिशियन, मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर, वेल्डर
शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग पदवी/ पदविका, 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI
एकूण जागा : 34 (यात इंजिनिअरसाठी 1 जागा, मेकॅनिकल मोटार वेहिकलसाठी 20 जागा, इलेक्ट्रिशियनसाठी तीन जागा, मोटार व्हेईकल बॉडी बिल्डरसाठी 9 जागा, वेल्डरसाठी 1 जागा आहे.)
वयोमर्यादा : 35 वर्षांपर्यंत
नोकरीचं ठिकाण : जालना
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 7 डिसेंबर 2022
तपशील : www.msrtc.gov.in