Job Majha: युनियन बँक ऑफ इंडिया आणि मीरा भाईंदर महानगरपालिकामध्ये नोकरीची संधी, आजच करा अर्ज
'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि., नागपूर
विविध पदांच्या १८ जागांसाठी भरती निघाली आहे.
पोस्ट - महाव्यवस्थापक, वरिष्ठ उप महाव्यवस्थापक, उप मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, व्यवस्थापक,सहाय्यक व्यवस्थापक , डेपो कंट्रोलर, स्टेशन कंट्रोलर, कनिष्ठ अभियंता
शैक्षणिक पात्रता - B.E./B.Tech, CA, ICWA, अनुभव (विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)
एकूण जागा - १८
नोकरीचं ठिकाण - नागपूर, पुणे, मुंबई
ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही अर्ज करु शकता.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३ जानेवारी २०२३
अर्ज पाठवण्याचा पत्ता - General Manager (HR) Maharashtra Metro Rail Corporation Ltd. Metro Bhawan, Near Dikshabhoomi, NAGPUR – 440 010.
अधिकृत वेबसाईट - www.mahametro.org (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
मीरा भाईंदर महानगरपालिका
विविध पदांच्या २३ जागांसाठी भरती निघाली आहे.
पोस्ट - वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ), वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, प्रसविका
मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.
मुलाखतीची तारीख – वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ) यासाठी – २७ डिसेंबर २०२२ आणि वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, प्रसविकासाठी २८ डिसेंबर २०२२
मुलाखतीचा पत्ता - डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, नगरभवन, तिसरा मजला, मांडली तलावाजवळ, भाईंदर (प), जि.ठाणे- ४०११०१
अधिकृत वेबसाईट - www.mbmc.gov.in
युनियन बँक ऑफ इंडिया
एकूण ३३ जागांसाठी भरती होत आहे.
पोस्ट - एक्सटर्नल फॅकल्टी
शैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी, Ph.D./ एम.फील पदवी, किमान ५ वर्षांचा अनुभव
एकूण जागा - १८
वयोमर्यादा - २८ ते ६० वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख - २७ डिसेंबर २०२२
तपशील - www.unionbankofindia.co.in
पोस्ट - इंडस्ट्री ऍडवायजर
शैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी, पीएच.डी.पदवी, किमान ५ वर्षांचा अनुभव
एकूण जागा - ९
वयोमर्यादा - २८ ते ६० वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख - २७ डिसेंबर २०२२
तपशील - www.unionbankofindia.co.in
पोस्ट - शिक्षणतज्ज्ञ
शैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी, पीएच.डी.पदवी, किमान ५ वर्षांचा अनुभव
एकूण जागा - ४
वयोमर्यादा - २८ ते ६० वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख - २७ डिसेंबर २०२२
तपशील - www.unionbankofindia.co.in
पोस्ट - एक्सटर्नल यूएलए हेड
शैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी, पीएच.डी.पदवी, किमान १० वर्षांचा अनुभव
एकूण जागा - २
वयोमर्यादा - २८ ते ६० वर्ष
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - २७ डिसेंबर २०२२
तपशील - www.unionbankofindia.co.in (या वेबसाईटवर गेल्यावर recruitments वर क्लिक करा. Click here to view current Recruitment यावर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. notification वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)