Job Majha : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि औरंगाबाद कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये विविध पदांसाठी भरती
Job Majha : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि औरंगाबाद कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.
Job Majha : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि औरंगाबाद कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. ऑनलाईन पद्धतीने या पदांसाठी अर्ज करायचा आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ
विविध पदांच्या 20 जागांसाठी भरती निघाली आहे.
पोस्ट : सहायक प्राध्यापक / Assistant Professor
शैक्षणिक पात्रता : M.Sc NET किंवा आरक्लेव्हॅनर विषयात पीएच.डी / MA
एकूण जागा : 14
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 3 जानेवारी 2023
तपशील : www.pdkv.ac.in
पोस्ट : शिक्षक (व्याख्याता)
शैक्षणिक पात्रता - M.P.Ed. किंवा M.Sc किंवा Ph.D. NET/ SET
एकूण जागा : 06
नोकरीचं ठिकाण : चंद्रपूर
ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : सह अधिष्ठाता, कृषी महाविद्यालय, जिल्हा- चंद्रपूर- 441224
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 3 जानेवारी 2023
तपशील : www.pdkv.ac.in (या वेबसाईटवर गेल्यावर recruitment वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
औरंगाबाद कॅन्टोन्मेंट बोर्ड
विविध पदांच्या 31 जागांसाठी भरती निघाली आहे.
पोस्ट : कनिष्ठ लिपिक
शैक्षणिक पात्रता : पदवीधर, टायपिंग, MS-CIT
एकूण जागा : 04
वयोमर्यादा : 21 ते 30 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 जानेवारी 2023
तपशील : aurangabad.cantt.gov.in
पोस्ट - ड्रेसर, इलेक्ट्रिशियन, प्रयोगशाळा सहाय्यक, माळी, मजूर, पंपचालक, वॉल्वमॅन
शैक्षणिक पात्रता : ड्रेसरसाठी 10वी पास, इलेक्ट्रिशियनसाठी 10वी पास, ITI, प्रयोगशाळा सहाय्यकसाठी 12वी पास, माळीसाठी गार्डनरच्या 1 वर्षाच्या प्रमाणपत्रासह 10वी पास, मजूरसाठी 10वी पास, पंपचालकसाठी 10वी पास, ITI, वॉल्वमॅनसाठी 10वी पास ही पात्रता हवी.
एकूण जागा : 7 (प्रत्येक पोस्टसाठी प्रत्येकी 1 जागा आहे.)
वयोमर्यादा : 21 ते 30 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 जानेवारी 2023
तपशील : aurangabad.cantt.gov.in
पोस्ट : शिपाई
शैक्षणिक पात्रता : 10वी पास
एकूण जागा : 03
वयोमर्यादा : 21 ते 30 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 जानेवारी 2023
तपशील : aurangabad.cantt.gov.in
पोस्ट : सफाई कर्मचारी
शैक्षणिक पात्रता : 7वी पास
एकूण जागा : 16
वयोमर्यादा : 21 ते 30 वर्ष
नोकरीचं ठिकाण : औरंगाबाद
अर्ज पाठवण्याचा पत्ता : कँटोन्मेंट बोर्ड कार्यालय, औरंगाबाद, बी. क्र. 10, आयकर कार्यालयासमोर, नगर रोड, छावणी औरंगाबाद-431002
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 जानेवारी 2023
तपशील : aurangabad.cantt.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर information मध्ये recruitment वर क्लिक करा. advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)