(Source: Poll of Polls)
10 वी पास तरुणाला थेट पर्मनंट सरकारी नोकरी, पगारही भरगच्च, कशी आहे ITBP कॉन्सेटबल पदाची निवडप्रक्रिया?
आयटीबीपी विभागातर्फे कॉन्स्टेबल पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज कुठे करावा, फी काय आहे, या सर्व गोष्टी जाणून घ्या..
मुंबई : भारत-तिबेट सीमा पोलीस बल म्हणजेच आईटीबीपीतर्फे (ITBP) तब्बल 819 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. 2 सप्टेंबरपासून त्यासाठी अर्ज मागवण्यास सुरुवातही झाली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत कॉन्सेटबल (स्वयंपाक सेवा) ग्रुप ‘सी’ या पदासाठी भरती केली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला 1 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येईल. एकूण 819 पदांसाठी ही भरती राबवली जात असून यातील 697 जागा या पुरुषांसाठी तर 122 जागा या महिलांसाठी आरक्षित आहेत. आयटीबीपी या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर recruitment.itbpolice.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला तुम्हाला भेट द्यावी लागेल.
ITBP Constable Vacancy 2024: अर्ज कसा कराल?
कॉन्स्टेबल या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला recruitment.itbpolice.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जावं लागेल. या संकेतस्थळावर जाऊन आयटीबीपी कॉन्स्टेबल भरती 2024 (स्वयंपाक सेवा) या लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर रजिस्ट्रेशन करून तुमची माहिती अपडेट करावी. एकदा लॉगीन झाल्यानंतर मग भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पाडावी. विचारलेली माहिती अचूक भरावी. यासह विचारण्यात आलेले कागदपत्रंही अपलोड करावेत. अर्जासाठीचे शुल्क भरून तुमची अर्जाची प्रक्रिया पूर्ण करा. अर्ज भरल्यानंतर तुम्ही तुमचा अर्ज डाऊनलोड करून घ्या.
ITBP Constable Recruitment 2024: पदभरतीसाठी अट काय?
आयटीबीपी कॉन्स्टेबल पदाच्या भरतीसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून कमीत कमी इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण झालेले असायला हवे. यासह फूड प्रोडक्शन किंवा किचनशी संबंधित NSQF लेव्हल 1 चा एखादा कोर्स केलेला असणे गरजेचे आहे. अर्ज केलेल्या उमेदवाराचे वय 18-25 वर्षांमध्ये असावे.
ITBP Constable Vacancy 2024: उमेदवाराची निवड कशी होणार?
ITBP कॉन्सेटबल पदाच्या भरतीसाठी उमेदवाराला वेगवेगळ्या निवड प्रक्रियेतून जावे लागेल. उमेदवाराची शारीरिक क्षमता चाचणी (पीईटी), लिखीत परीक्षा, कागदत्रांची पडताळणी, वैद्यकीय चाचणी होईल. या सर्व प्रक्रियेतून यशस्वी झाल्यास संबंधित उमेदवाराला नियुक्तीपत्र दिले जाईल.
ITBP Constable Recruitment 2024: अर्ज करण्यासाठी किती फी लागणार ?
या पदासाठी अर्ज करायचा असेल तर सामान्य उमेदवाराला 100 रुपये शुल्क लागेल. तर महिला, माजी सैनिक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवाराला कोणतीही फी नसेल. या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक माहिती हवी असेल तर recruitment.itbpolice.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
हेही वाचा :
शिक्षण फक्त 12, पगार तब्बल 70000! 'या' खात्यात सरकारी नोकर होण्याची संधी; जाणून घ्या A टू Z माहिती
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI