एक्स्प्लोर

Indian Oil मध्ये बंपर भरती; 1760 पदं भरणार, अर्ज करण्याची 'ही' शेवटची तारीख

IOCL Apprentice Recruitment 2022: इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये शिकाऊ पदासाठी आजपासून म्हणजेच 14 डिसेंबर 2022 पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात अर्ज करावेत.

IOCL Apprentice Recruitment 2022: सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असाल? तर ही संधी सोडू नका. दहावी उत्तीर्ण उमेदवारांपासून ते पदवीधरांपर्यंत सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं (Indian Oil Corporation) अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या पदांसाठीचे अर्ज आजपासून म्हणजेच, 14 डिसेंबर 2022 बुधवारपासून सुरू झाले आहेत. जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत. त्यांनी शेवटच्या तारखेपूर्वी फॉर्म भरावा. या रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 जानेवारी 2023 आहे. या भरतीची विशेष बाब म्हणजे, दहावी, बारावी उत्तीर्ण आणि पदवीधर उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. 

अनेक पदांसाठी भरती 

IOCL च्या या भरती मोहिमेद्वारे एकूण 1760 पदांची भरती केली जाईल. यामध्ये ट्रेड अप्रेंटिस, ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिस या पदांचा समावेश आहे. निवडीनंतर, उमेदवारांची दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, झारखंड, चंदीगड, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात इत्यादी देशभरातील विविध राज्यांमध्ये नियुक्ती केली जाईल.

कोण अर्ज करू शकतं अर्ज? 

या पदांसाठी अर्ज करण्याची पात्रता पदांनुसार वेगळी आहे. दहावी पास उमेदवार ट्रेड अप्रेंटिसच्या पदासाठी अर्ज करू शकतात. किमान 50 टक्के गुणांसह अभियांत्रिकी उत्तीर्ण उमेदवार तंत्रज्ञ पदासाठी अर्ज करू शकतात आणि किमान 50 टक्के गुणांसह बीए, बीएससी, बीकॉम उत्तीर्ण उमेदवार पदवीधर उमेदवार पदासाठी अर्ज करू शकतात. तिनही प्रकरणांमध्ये, उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रातील आयटीआय डिप्लोमा देखील असणं आवश्यक आहे. राखीव प्रवर्गाला गुणांमध्ये सूट मिळेल. या पदांसाठी 21 ते 24 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

निवड कशी होईल? 

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या या पदांसाठी उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षेद्वारे केली जाईल. परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न येतील. प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्याय दिले जातील. त्यापैकी एक बरोबर असेल. निवड झाल्यानंतर या उमेदवारांची सेवा एक वर्षासाठी असेल. फक्त ट्रेड अप्रेंटिस (डेटा एंट्री ऑपरेटर) 15 महिने आणि ट्रेड अप्रेंटिस (रिटेल सेल्स असोसिएट) 14 महिने असेल. 

अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.  

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Job Majha : भारतीय विमानतळ प्राधिकरण मुंबई आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे विविध पदांसाठी भरती 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BJP vs MNS Clash: मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेत राडा! भाजप अन् मनसे कार्यकर्ते एकमेकांना भिडले; एक जण जखमी, नेमकं काय घडलं?
मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेत राडा! भाजप अन् मनसे कार्यकर्ते एकमेकांना भिडले; एक जण जखमी, नेमकं काय घडलं?
Grok वर आता अश्लील AI फोटो तयार होणार नाही; 3500 पोस्ट काढून टाकल्या, 600 हून अधिक खाती हटवली
Grok वर आता अश्लील AI फोटो तयार होणार नाही; 3500 पोस्ट काढून टाकल्या, 600 हून अधिक खाती हटवली
मोठी बातमी! 15 बिनविरोध आलेल्या डोंबिवलीत भाजपकडून 3000 चे पाकीटं, शिंदेसेनेनं उघडं पाडलं; पोलीसही पोहोचले
मोठी बातमी! 15 बिनविरोध आलेल्या डोंबिवलीत भाजपकडून 3000 चे पाकीटं, शिंदेसेनेनं उघडं पाडलं; पोलीसही पोहोचले
तब्बल 20 वर्षानी होणाऱ्या शिवतीर्थावर होणाऱ्या संयुक्त शिवगर्जनेला अवघे काही तास अन् राज ठाकरेंची भावनिक साद
तब्बल 20 वर्षानी होणाऱ्या शिवतीर्थावर होणाऱ्या संयुक्त शिवगर्जनेला अवघे काही तास अन् राज ठाकरेंची भावनिक साद

व्हिडीओ

Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका
Prakash Mahajan On Sanjay Raut Thane : संजय राऊत यांच्यावर टीका करताना प्रकाश महाजन यांची जीभ घसरली
Rupali Thombare Pune:Ajit Pawar यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या Mahesh Landgeयांच्यावर ठोंबरे संतापल्या
Sanjay Raut Mumbai: फडणवीसांना आव्हान, 11 लाखांचं बक्षीस; ठाकरें बंधूंच्या सभेआधी संजय राऊत काय काय म्हणाले?
Eknath Shinde Majha Katta :मुंबई,श्रेयवाद,ठाकरे बंधू ते महायुती! एकनाथ शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP vs MNS Clash: मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेत राडा! भाजप अन् मनसे कार्यकर्ते एकमेकांना भिडले; एक जण जखमी, नेमकं काय घडलं?
मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेत राडा! भाजप अन् मनसे कार्यकर्ते एकमेकांना भिडले; एक जण जखमी, नेमकं काय घडलं?
Grok वर आता अश्लील AI फोटो तयार होणार नाही; 3500 पोस्ट काढून टाकल्या, 600 हून अधिक खाती हटवली
Grok वर आता अश्लील AI फोटो तयार होणार नाही; 3500 पोस्ट काढून टाकल्या, 600 हून अधिक खाती हटवली
मोठी बातमी! 15 बिनविरोध आलेल्या डोंबिवलीत भाजपकडून 3000 चे पाकीटं, शिंदेसेनेनं उघडं पाडलं; पोलीसही पोहोचले
मोठी बातमी! 15 बिनविरोध आलेल्या डोंबिवलीत भाजपकडून 3000 चे पाकीटं, शिंदेसेनेनं उघडं पाडलं; पोलीसही पोहोचले
तब्बल 20 वर्षानी होणाऱ्या शिवतीर्थावर होणाऱ्या संयुक्त शिवगर्जनेला अवघे काही तास अन् राज ठाकरेंची भावनिक साद
तब्बल 20 वर्षानी होणाऱ्या शिवतीर्थावर होणाऱ्या संयुक्त शिवगर्जनेला अवघे काही तास अन् राज ठाकरेंची भावनिक साद
नवी मुंबई विमानतळास दि.बा.पाटलांचं नाही, नरेंद्र मोदींचं नाव द्यायचंय, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप
नवी मुंबई विमानतळास दि.बा.पाटलांचं नाही, नरेंद्र मोदींचं नाव द्यायचंय, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप
Share Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं बाजारमूल्य 3.63 लाख कोटींनी घटलं, सर्वाधिक नुकसान 'या' कंपनीचं झालं
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं बाजारमूल्य 3.63 लाख कोटींनी घटलं, सर्वाधिक नुकसान 'या' कंपनीचं झालं
Nashik Municipal Election 2026: नाशिकच्या प्रभाग 8 मध्ये जादूटोणा? हळद, कुंकू, तांदूळ आढळल्याने खळबळ, शिवसेनेच्या विलास शिंदेंचा विरोधकांवर गंभीर आरोप
नाशिकच्या प्रभाग 8 मध्ये जादूटोणा? हळद, कुंकू, तांदूळ आढळल्याने खळबळ, शिवसेनेच्या विलास शिंदेंचा विरोधकांवर गंभीर आरोप
Gold Rate Weekly Update : आठवड्यात सोनं स्वस्त झालं की महाग, चांदी दरातील तेजी सुरुच, जाणून घ्या बाजारात काय घडलं?
आठवड्यात सोनं स्वस्त झालं की महाग, चांदी दरातील तेजी सुरुच, जाणून घ्या बाजारात काय घडलं?
Embed widget