Railway Recruitment 2023 : दहावी पास उमेदवारांना भारतीय रेल्वेत नोकरीची संधी, 3654 पदांवर बंपर भरती
RRC WR Railway Recruitment 2023 : दहावी पास उमेदवारांना भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची संधी आहे. 3654 पदांवर बंपर भरती करण्यात येत आहे.
RRC WR Railway Recruitment 2023 : सध्या भारतीय रेल्वेत (Indian Railway) बंपर भरती (Job Vacancy) सुरु आहे. दहावी पास (SSC Pass) उमेदवारांना भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची संधी (Indian Railway Jobs) आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेलने पश्चिम रेल्वेसाठी भरती अधिसूचना (RRC WR Railway Recruitment 2023 Notification) जारी करण्यात आली आहे. यासाठी RRC WR ने दहावी पास उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. ही भरती स्पोर्ट्स कोटा अंतर्गत केली जात आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास आधीच सुरुवात झाली आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळ न दवडता लवकरात लवकर अर्ज करा.
10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरीची संधी
RRC WR रेल्वे भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 डिसेंबरपर्यंत आहे. पश्चिम रेल्वे भरती अंतर्गत 3654 पदांवर बंपर भरती करण्यात येणार आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेलने जारी केलेली पश्चिम रेल्वे भरती अधिसूचना ग्रुप कोड पदांसाठी जारी केली आहे. ही भरती परीक्षा न घेता होणार आहे, त्यामुळे शेवटच्या तारखेची वाट न पाहता लगेचच अर्ज दाखल करा.
RRC WR Railway Recruitment 2023 : महत्त्वाच्या तारखा
- ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू : 10 नोव्हेंबर 2023
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 डिसेंबर 2023
RRC WR Railway Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता
रेल्वे भरतीसाठी शैक्षणिक पात्रता सर्व पदांसाठी वेगळी ठेवण्यात आली आहे. यामध्ये स्तर 1 ते स्तर 5 पदांवर भरती करण्यात येणार आहे. स्तर 1 साठी, उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा आणि त्याच्याकडे ITIT प्रमाणपत्रासह क्रीडा पात्रता असणे आवश्यक आहे. तर स्तर 2 आणि 3 साठी, क्रीडा पात्रतेसह मान्यता प्राप्त मंडळाकडून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. स्तर 4 आणि 5 साठी बॅचलर पदवीसह क्रीडा पात्रता आवश्यक आहे.
RRC WR Railway Recruitment 2023 : वयोमर्यादा
या रेल्वे भरतीअंतर्गत उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 25 वर्षे असावे. या भरतीसाठी वय 1 जानेवारी 2024 पर्यंत मोजलं जाईल. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सूट मिळेल.
RRC WR Railway Recruitment 2023 : निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड परीक्षा न करता केली जाईल. त्यामुळे आरआरसीकडून कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाही. ही भरती स्पोर्ट्स कोटा अंतर्गत केली जात आहे.
RRC WR Railway Recruitment 2023 : अर्ज फी
रेल्वे रिक्रूटमेंट सेलने पश्चिम रेल्वे भरतीसाठी, सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना फीमध्ये सूट असून त्यांना 250 रुपये शुल्क भरावे लागेल. अर्जाची फी फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करताना भरावी लागेल.