एक्स्प्लोर

Railway Job 2024 : रेल्वेमध्ये बंपर भरती, 5000 हून अधिक रिक्त जागा; अधिक माहिती वाचा

Railway Recruitment 2024 : भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. 5000 हून अधिक पदांवर बंपर भरती करण्यात येत आहे.

RRC ALP Railway Recruitment 2024 : भारतीय रेल्वेत (Indian Railway) बंपर भरती (Job Vacancy) सुरु आहे. या भरती अंतर्गत 5000 हून अधिक पदांवर भरती करण्यात येत आहे. भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी (Indian Railway Jobs) आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेलने असिस्टंट लोको पायलट पदांसाठी भरतीची अधिसूचना (RRC ALP Railway Recruitment 2024 Notification) जारी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार IndianRailways.gov.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज दाखल करु शकतात.

भारतीय रेल्वेमध्ये 5996 पदांवर बंपर भरती

तुम्ही भारतीय रेल्वेमध्ये नोकरी शोधत असाल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. रेल्वे भर्ती बोर्डाने पाच हजारांहून अधिक असिस्टंट लोको पायलट पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. यासाठी 20 जानेवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. ज्या उमेदवारांना सहाय्यक लोको पायलटच्या (Assistant Loco Pilot) या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते RRB च्या प्रादेशिक वेबसाइट्सवर जाऊन फॉर्म भरू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 फेब्रुवारी 2024 आहे.

RRC ALP Railway Recruitment 2024 : महत्त्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू : 20 जानेवारी 2024

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 फेब्रुवारी 2024

RRC ALP Railway Recruitment 2024 : रिक्त पदांचा तपशील

या मोहिमेद्वारे रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) असिस्टंट लोको पायलट (ALP) ची पदे भरणार आहे. या मोहिमेद्वारे असिस्टंट लोको पायलटच्या एकूण 5996 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्‍यासाठी, उमेदवारांना संबंधित क्षेत्रात किंवा शिस्तीत ITI किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

RRC ALP Railway Recruitment 2024 : वयोमर्यादा

रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या भरतीसाठी पात्र उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल 30 वर्षे असणे आवश्यक आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार सवलत दिली जाईल. यासाठी उमेदवाराने अधिकृत अधिसूचनेतील तपशील पाहावा.

RRC ALP Railway Recruitment 2024 : पगार किती मिळेल?

या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला 19 हजार 900 रुपये वेतन दिले जाईल.

RRC ALP Railway Recruitment 2024 : निवड कशी होईल?

असिस्टंट लोको पायलट होण्यासाठी, उमेदवारांची निवड तीन टप्प्यांमध्ये करण्यात येईल. यामध्ये संगणक आधारित चाचणी (CBT),  संगणक आधारित अभियोग्यता चाचणी (CBAT), आणि वैद्यकीय परीक्षा यांचा समावेश आहे.

RRC ALP Railway Recruitment 2024 : अर्ज शुल्क

या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. प्रचारासाठी अर्ज करणाऱ्या सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर अर्ज करणाऱ्या SC, ST, माजी सैनिक, PWBD, महिला आणि तृतीय लिंग श्रेणीतील उमेदवारांना फक्त 250 रुपये शुल्क भरावे लागेल.

RRC ALP Railway Recruitment 2024 : अर्ज कसा आणि कुठे दाखल कराल?

भरती मोहिमेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट IndianRailways.gov.in ला भेट द्यावी. उमेदवारांनी होमपेजवरील लोको पायलट भरतीसंबंधित लिंकवर क्लिक करून अर्ज करावा. अर्जामध्ये योग्य माहिती प्रविष्ट करून अर्ज दाखल करा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्जाची फी भरा. यानंतर दाखल केलेल्या अर्जाची प्रिंट घ्यायला विसरू नका.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

CRPF Recruitment 2024 : सीआरपीएफमध्ये बंपर भरती, दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; अर्ज कुठे कराल?

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Pangri Walmik Karad :वाल्मिक कराडला 7 दिवस कोठडी;कराड आरोपींच्या संपर्कात असल्याचा दावाZero hour on Pune | महापालिकेचे महामुद्दे | पुणे टेकड्यांवर चोरी,मारहाण,अत्याचाराचे प्रकार वाढलेZero Hour On Walmik Karad : वाल्मिक कराडला कोठडी, पांगरीत निदर्शन; SIT नं कोर्टात काय सांगितलं?Zero Hour Full :  कराडवर मकोका अंतर्गत हत्येचा आरोप, कोर्टात काय घडलं ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Embed widget