एक्स्प्लोर

CRPF Recruitment 2024 : सीआरपीएफमध्ये बंपर भरती, दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; अर्ज कुठे कराल?

CRPF Constable Jobs 2024 : सीआरपीएफ (CRPF) म्हणजे केंद्रीय राखीव पोलीस दलात बंपर भरती करण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 16 जानेवारी 2024 पासून सुरु झाली आहे.

CRPF Constable Recruitment 2024 : दहावी पास (SSC Pass) असाल आणि सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. दहावी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. सीआरपीएफ (CRPF) म्हणजे केंद्रीय राखीव पोलीस दलात (Central Reserve Police Force) नोकर भरती करण्यात येत आहे. सीआरफीएफ कॉन्सेटबल भरती 2024 ची अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 16 जानेवारी 2024 पासून सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवार rect.crpf.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज दाखल करु शकतात. सीआरफीएफ कॉन्सेटबल भरती 2024 साठी पात्रता, वयोमर्यादा आणि इतर तपशिल जाणून घ्या.

CRPF मध्ये बंपर भरती

सीआरपीएफ (CRPF) म्हणजे केंद्रीय राखीव पोलीस दलात बंपर भरती करण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी 15 फेब्रवारी शेवटची तारीख असून त्यानंतर उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार नाही. 

CRPF Constable Recruitment 2024 : महत्त्वाच्या तारखा

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 16 जानेवारी 2024

अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 15 फेब्रुवारी 2024

CRPF Constable Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी पात्र उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त संस्था किंवा विद्यापिठातून दहावी पास असणे आवश्यक आहे.

CRPF Constable Recruitment 2024 : वयोमर्यादा

सीआरपीएफ कॉन्स्टेबल भरतीच्या अधिसूचनेनुसार, या भरतीसाठी पात्र उमेदवाराचं वय किमान 18 वर्षात आणि कमाल 23 वर्ष आवश्यक आहे.

CRPF Constable Recruitment 2024 : पगार किती मिळेल?

सीआरपीएफ भरतीअंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला 21 हजार 700 रुपये ते 69 हजार 100 रुपये यादरम्यार पगार मिळेल.

CRPF Constable Recruitment 2024 : अर्ज शुल्क

या भरती मोहिमेअंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्ज शुल्क भरावं लागेल. अर्ज करणार्‍या अनारक्षित प्रवर्गातील, इतर मागासवर्गीय आणि EWS श्रेणीतील पुरुष उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावं लागेल. तर महिला प्रवर्ग, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत साइटवरील अधिसूचना पाहू शकतात.

सुशिक्षित बेरोजगारांपुढचा मोठा प्रश्न ओळखूनच एबीपी माझा तुमच्यासाठी घेऊन आलंय. जॉब माझा (Job Majha) विविध क्षेत्रातल्या नोकरीच्या संधी कुठे आहेत, कसं अप्लाय करायचं, कुठे संपर्क साधायचा याविषयीची माहिती देण्याचा आमचा हा एक प्रयत्न आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

IAF Recruitment 2024 : भारतीय हवाई दलात नोकरीची संधी! अग्निवीर भरती प्रक्रियेला सुरुवात तपशील जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलीत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलीत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Chhatrapati Sambhaji nagar boy jumps down from mountain: सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला,
सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला, "आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन"
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'

Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Embed widget