Indian Railway : भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! 1646 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध, असा करा अर्ज
Indian Railway Apprentice Recruitment 2024 : भारतीय रेल्वेमध्ये अप्रेंटिस म्हणजे शिकाऊ उमेदवारांच्या पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.
Indian Railway Apprentice Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असाल आणि तुम्हाला भारतीय रेल्वेमध्ये (Indian Railway) नोकरी करायची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेल जयपूरने एक अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार रेल्वेत अप्रेंटिस उमेदवारांच्या पदांसाठी भरती (Job Opportunity In Indian Railway) होणार आहे. या मोहिमेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत साईट rrcjaipur.in वर जाऊन भरती मोहिमेसाठी अर्ज करू शकतील.
या अर्जाची प्रक्रिया 10 जानेवारी 2024 पासून सुरू होईल. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी 2024 आहे. अर्जाच्या शेवटच्या तारखेनंतर उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळणार नाही.
या भरती मोहिमेद्वारे रेल्वेमध्ये 1646 अप्रेंटिस पदे भरण्यात येणार आहेत. ज्यासाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेतून 10वी/मॅट्रिक उत्तीर्ण असावा. यासोबतच उमेदवाराकडे संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा (Age Limit For Indian Railway Apprentice Recruitment 2024)
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 15 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे असावे. त्याच वेळी आरक्षित श्रेणीतील उमेदवारांना अर्ज करणाऱ्यांना कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
अर्जासाठी इतकी फी भरावी लागेल ( Fee For Indian Railway Apprentice Recruitment 2024)
रेल्वेच्या या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क जमा करावे लागेल. तर अर्ज करणाऱ्या SC/ST PWBD/महिला उमेदवारांना या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
निवड अशी होईल ( Process For Indian Railway Apprentice Recruitment 2024)
या भरतीमध्ये निवडलेल्या उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे गुणवत्ता यादीत समाविष्ट केले जाईल. दहावी किंवा मॅट्रिकमध्ये मिळालेल्या गुणांना 15 टक्के वेटेज आणि आयटीआयला 15 टक्के वेटेज दिले जाईल. ज्या उमेदवारांची नावे गुणवत्ता यादीत असतील त्यांना रिक्त पदांवर काम मिळेल.
ही बातमी वाचा: