India Post Recruitment 2022 : भारतीय टपाल विभागात तब्बल 38,926 पदांची भरती; लवकर अर्ज करा, आज शेवटची तारीख
India Post Recruitment 2022 : भारतीय टपाल विभागात नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. तब्बल 38,926 पदांची भरती निघाली आहे.
India Post Recruitment 2022 : तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतीय टपाल विभाग, महाराष्ट्रमध्ये भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे तरूणांना टपाल विभागात नोकरी करून करिअर घडविण्याची सुवर्णसंधी आहे. नोकरीची तयारी करत असलेले तरुण उमेदवार ज्यांच्याकडे 10 वी पासची पदवी आहे ते या पदासठी अर्ज करू शकतात. एकूण 38,926 पदांची भरती होणार आहे. मात्र, या पदासाठी अर्ज करण्याची 5 जून (आज) शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यासाठी, तुम्ही खाली दिलेल्या थेट लिंकद्वारे नोंदणी करू शकता.
अधिक तपशीलांसाठी उमेदवारांना अधिकृत अधिसूचना तपासण्याचा सल्ला दिला जातो. त्यानंतरच अर्ज करा. विशेष म्हणजे या नोकऱ्या केंद्र सरकारच्या आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक राज्यासाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे उमेदवार स्वतःच्या राज्यातील जागांसाठी अर्ज करू शकतात.
इंडिया पोस्ट GDS भर्ती 2022 (India Post Recruitment 2022) :
शैक्षणिक पात्रता :
ग्रामीण डाक सेवकाच्या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे 10 वी पासची पदवी असावी.
वयोमर्यादा :
या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांचं वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना भारत सरकारच्या नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
वेतन :
या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 10,000 ते 12,000 रुपये वेतन दिलं जाईल. तसेच, उमेदवारांना अर्ज फी म्हणून 100 रुपये भरावे लागतील. सर्व कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड कराव्या लागतील.
इतर कोणत्याही माहितीसाठी उमेदवार indiapost.gov.in या वेबसाइटची मदत घेऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या :