एक्स्प्लोर

India Post Jobs 2022 : टपाल विभागात 98 हजारांहून अधिक पदांसाठी भरती; दहावी, बारावी झालेल्यांसाठी नोकरीची संधी

India Post Recruitment 2022 : भारतीय टपाल विभागाने पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी-टास्किंग स्टाफ अशा विविध पदांसाठी एकूण 98083 रिक्त जागांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे.

India Post Recruitment 2022 : दहावी आणि बारावी पास झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीची नामी संधी चालून आली आहे.  भारतीय टपाल विभागात 98 हजारांहून अधिक पदांवर भरती करण्यात येणार आहे. भारतीय टपाल विभागाने अधिकृत इंडिया पोस्ट वेब पोर्टलवर पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी-टास्किंग स्टाफ इत्यादी पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 98083 रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. याभरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार indiapost.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही पण डिसेंबर महिन्यापर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर या संधीचा लाभ घ्यावा.

India Post Recruitment 2022 : रिक्त जागांचा तपशील

एकूण रिक्त पदे - 98083

  • पोस्टमन - 59,099
  • मेलगार्ड - 1,445
  • मल्टी-टास्किंग (MTS) - 37,539

23 सर्कलमध्ये भरती

भारतीय टपाल विभागात एकूण 98 हजार 83 रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. दहावी आणि बारावी पास उमेदवारांना यासाठी अर्ज करता येणार आहे. पोस्ट ऑफिसमधील भरती अंतर्गत एकूण 23 सर्कलमधील रिक्त जागांवर भरती केली जाते. उमेदवार त्यांच्या राज्य किंवा मंडळानुसार ऑनलाइन अर्ज भरू शकतात.

India Post Office Recruitment 2022 : वयोमर्यादा ( Age Limit )

पोस्टमन, मेलगार्ड आणि मस्टी टास्किंग स्टाफ या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 32 वर्ष या दरम्यान असावे. SC, ST, OBC, PWD आणि PH उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

श्रेणींसाठी सवलती

  • SC/ST - 5 वर्ष सवलत
  • ओबीसी - 3 वर्ष सवलत
  • इडब्ल्युसी - एनए, पीडब्ल्युसाठी 10 वर्ष सवलत
  • पीडब्ल्यूडी एससी/एसटी - 15 वर्ष सवलत

India Post Office Recruitment 2022 : शैक्षणिक पात्रता ( Eligibility )

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून दहावी किंवा बारावी उत्तीर्ण उमेदवार या भरती अंतर्गत अर्ज करू शकतात. उमेदवारांना संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

India Post Office Recruitment 2022 : अर्जाचे शुल्क

या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवाराला 100 रुपये शुल्क भरावे लागेल.

अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special ReportChay Wale Baba |  41 वर्षांपासून मौनव्रत, चायवाल्या बाबाची महाकुंभ मेळ्यात चर्चा Special Report100 Headlines |  महाराष्ट्र सुपरफास्ट शंभर बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
Embed widget