एक्स्प्लोर

Job News : नगरचना आणि मूल्यनिर्धारण विभागात अनुरेखक पदाची 126 जागांसाठी भरती, 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, अनुरेखक पदाच्या 126 जागांसाठी भरती, 69 हजारांपर्यंत पगाराची संधी

मुंबई : महाराट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये सरकारी नोकरी करण्याची इच्छी असणाऱ्या तरुणांसाठी चांगली बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं गेल्या दोन दिवसांमध्ये एकूण 2055 पदांसाठी विविध सेवांमधील 5 जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. आता आणखी एका सरकारी विभागातील भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत अनुरेखक पदांची भरती करण्यात येणार आहे. पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागातील गट क संवर्गातील अनुरेखक पदांची भरती  केली जाणार आहे.  

अनुरेखक पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना www.urban.maharashtra.gov. in व संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या www.dtp.maharashtra.gov.in या वेबसाईटवर अर्ज दाखल करता येतील. अनुरेखक पदासाठी 18 ऑक्टोबर पासून 17 नोव्हेंबरदरम्यान अर्ज दाखल करता येतील. या भरतीची जाहिरात रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयाच्या https://ese.mah.nic.in या वेबसाईटवर पाहता येईल.  

शैक्षणिक पात्रता 

अनुरेखक पदासाठी उमेदवारांनी बारावीनंतर  मान्यताप्राप्त शासकीय संस्थेतून दोन वर्षाचे आरेखक पाठ्यक्रम (स्थापत्य) प्रमाणपत्र धारण केलेले किंवा शासनाने वेळोवेळी घोषित केलेली इतर कोणतीही समतुल्य अर्हता मिळवलेली असणं आवश्यक आहे. याशिवाय मान्यताप्राप्त संस्थेतून स्वयं संगणक सहाय्यित आराखडा (ऑटो-कॅड) (Auto-CAD) किंवा अवकाशीय नियोजन यामध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (Geographical Information System in Spatial Planning) उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणं आवश्यक आहे. 
 
अनुरेखक पदाची परीक्षा कधी होणार?

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाच्यावतीनं ऑनलाईन परीक्षेचं वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे. उमेदवारांनी परीक्षेसंदर्भात अपडेटस साठी www.dtp.maharashtra.gov.in ला सातत्यानं भेट देणं आवश्यक आहे. भरती प्रक्रियेत अधिक अर्ज दाखल झाल्यास विविध सत्रांमध्ये परीक्षा घेतली जाणर आहे. 

अनुरेखक या पदासाठीची परीक्षा दोन स्तरांवर घेण्यात येणार असून प्रथमतः बहुपर्यायी ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या परीक्षेमध्ये किमान 45 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविलेल्या पात्र उमेदवारांचीच व्यावसायिक चाचणी परीक्षा स्वतंत्रपणे, स्वतंत्र वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहे.   

अर्ज कधी करायचा?

ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी 18 ऑक्टोबर 2024 ते 17 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. ऑनलाईन परीक्षेची तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे. परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये तर राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये आहे.  

वयोमर्यादा :

अनुरेखक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय  18 वर्षे पूर्ण ते 38 वर्षांदरम्यान असावं.राखीव प्रवर्गातून अर्ज करणाऱ्यांसाठी वयोमर्यादा 43 वर्ष असेल. तर,पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा 55 वर्षांपर्यंत आहे. 

इतर बातम्या :

MPSC कडून नगरविकास विभागातील 208 आणि शिक्षण सेवेतील प्राध्यापकांच्या 32 जागांची भरती, आयोगाच्या वेबसाईटवर जाहिरात प्रसिद्ध, जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Goregaon : गोरेगावात 33 हजार घरांचा मार्ग मोकळा, प्रकल्प खासगी विकासकाकडून करून घेण्यास म्हाडाला परवानगी
गोरेगावात 33 हजार घरांचा मार्ग मोकळा, प्रकल्प खासगी विकासकाकडून करून घेण्यास म्हाडाला परवानगी
Nashik MHADA : नाशिक म्हाडासाठी अर्ज करण्यासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ, 502 घरांसाठी निघणार लॉटरी 
नाशिक म्हाडासाठी अर्ज करण्यासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ, 502 घरांसाठी निघणार लॉटरी 
राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
लाडकी बहीण योजना काबाड-कष्ट करणाऱ्या महिलांसाठी, पण वेगळ्यांनीच लाभ घेतला; मिटकरींचं वक्तव्य चर्चेत
लाडकी बहीण योजना काबाड-कष्ट करणाऱ्या महिलांसाठी, पण वेगळ्यांनीच लाभ घेतला; मिटकरींचं वक्तव्य चर्चेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Satish Bhosale Profile : नोटांचे बंडल, दहशत पसरवणारा सतिश भोसले आहे तरी कोण?Vaibhavi Deshmukh : Santosh Deshmukh यांच्या मन हेलावून टाकणाऱ्या फोटोंवर लेकीची पहिली प्रतिक्रियाBhaiyyaji Joshi Marathi Language : भय्याजी इथे फक्त मराठीच! भाषेच्या मुद्दयानं दिवसभर गदारोळSpecial Report Walmik Karad Property : खंडणीच्या जोरावर उभं केलेलं आकाचं सम्राज्य, कराडचं घबाड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Goregaon : गोरेगावात 33 हजार घरांचा मार्ग मोकळा, प्रकल्प खासगी विकासकाकडून करून घेण्यास म्हाडाला परवानगी
गोरेगावात 33 हजार घरांचा मार्ग मोकळा, प्रकल्प खासगी विकासकाकडून करून घेण्यास म्हाडाला परवानगी
Nashik MHADA : नाशिक म्हाडासाठी अर्ज करण्यासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ, 502 घरांसाठी निघणार लॉटरी 
नाशिक म्हाडासाठी अर्ज करण्यासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ, 502 घरांसाठी निघणार लॉटरी 
राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
लाडकी बहीण योजना काबाड-कष्ट करणाऱ्या महिलांसाठी, पण वेगळ्यांनीच लाभ घेतला; मिटकरींचं वक्तव्य चर्चेत
लाडकी बहीण योजना काबाड-कष्ट करणाऱ्या महिलांसाठी, पण वेगळ्यांनीच लाभ घेतला; मिटकरींचं वक्तव्य चर्चेत
बाप रे... विठुरायाच्या पंढरीत तब्बल 147 किलो गांजा जप्त; अमली पदार्थाविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई
बाप रे... विठुरायाच्या पंढरीत तब्बल 147 किलो गांजा जप्त; अमली पदार्थाविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई
वडिलांना औरंगजेबाची उपमा, सुनिल तटकरेंचा लेक संतापला; शिवसेना आमदार थोरवेंचा व्हिडिओ दाखवला
वडिलांना औरंगजेबाची उपमा, सुनिल तटकरेंचा लेक संतापला; शिवसेना आमदार थोरवेंचा व्हिडिओ दाखवला
शॉकिंग! 'या' मठाचा मीच पुजारी अन् मालक म्हणत 64 वर्षीय शिवाचार्य स्वामींना लोखंडी गजाने जबर मारहाण
शॉकिंग! 'या' मठाचा मीच पुजारी अन् मालक म्हणत 64 वर्षीय शिवाचार्य स्वामींना लोखंडी गजाने जबर मारहाण
Video : तुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या? भय्याजी जोशींचं समर्थन करत सदावर्तेंचा ठाकरेंना बोचरा सवाल
Video : तुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या? भय्याजी जोशींचं समर्थन करत सदावर्तेंचा ठाकरेंना बोचरा सवाल
Embed widget