Coal Ministry Recruitment 2024 : पगार 75 हजार अन् परीक्ष न घेता निवड! कोळसा मंत्रालयात 'या' पदासाठी लगेच करा अर्ज
Coal Ministry Recruitment 2024 : कोळसा मंत्रालयाच्या या भरतीअंतर्गत एकूण 03 पदे भरली जाणार आहेत.
Coal Ministry Recruitment 2024 : कोळसा मंत्रालयात (Coal Ministry) नोकरी (Government Job) करण्यास इच्छुक असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची (Job) उत्तम संधी आहे. यासाठी मंत्रालयाने तरुण व्यावसायिकांसाठी भरतीची सूचना जारी केल्या आहेत. या भरती अंतर्गत एकूण 3 पदे भरली जाणार आहेत. पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार कोळसा मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईट coal.nic.in वर अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
या पदांसाठी उमेदवार 31 मार्च किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. तुम्हीही कोळसा मंत्रालयात काम करण्याचा विचार करत असाल तर खाली दिलेल्या या गोष्टी काळजीपूर्वक वाचा.
कोळसा मंत्रालयासाठी अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा
जे उमेदवार कोळसा मंत्रालय भरती 2024 साठी अर्ज करणार आहेत, त्यांची वयोमर्यादा 35 वर्षांपेक्षा जास्त नसावी.
कोळसा मंत्रालयात फॉर्म भरण्यासाठी पात्रता
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून खाण अभियांत्रिकीमध्ये पदवी/ पदव्युत्तर पदवी (B.Tech किंवा BE/M.Tech) असणे आवश्यक आहे.
कोळसा मंत्रालयात नोकरी मिळाल्यावर इतके वेतन मिळणार
कोळसा मंत्रालय भर्ती 2024 अंतर्गत या पदांसाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांची निवड केल्यास त्यांना 75000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अशा प्रकारे होणार निवड
कोळसा मंत्रालय भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड ही कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा न देता होणार आहे. मात्र, यासाठी इच्छुक उमेदवारांची निवड वैयक्तिक मुलाखतीच्या माध्यमातून घेतली जाईल. समिती वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे केली जाईल. केवळ निवडलेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
महत्त्वाच्या बातम्या :