Bank Jobs: सेंट्रल बँक होम फायनान्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी जाणून घ्या
Bank Jobs: या भरती प्रक्रियेअंतर्गत अधिकारी, वरिष्ठ अधिकारी आणि कनिष्ठ व्यवस्थापक अशा अनेक पदांवर भरती केली जाणार आहे.
Bank Jobs: तुम्ही बँकेत नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सेंट्रल बँक होम फायनान्स लिमिटेड (CBHFL) ने विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 ऑगस्ट 2022 आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत अधिकारी, वरिष्ठ अधिकारी आणि कनिष्ठ व्यवस्थापक अशा अनेक पदांवर भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत साइट cbhfl.com ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात आणि IBPS पोर्टल ibps.in द्वारे देखील ऑनलाइन अर्ज करू शकतात.
किती पदांसाठी भरती?
CBHFL मध्ये 22 अधिकारी, 16 वरिष्ठ अधिकारी आणि 7 कनिष्ठ व्यवस्थापकांसह एकूण 45 पदे भरायची आहेत.
शैक्षणिक पात्रता
अधिसूचनेनुसार, या बँक भरती अंतर्गत कनिष्ठ व्यवस्थापक आणि इतर पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर असावा. त्याचबरोबर उमेदवाराला संगणकाचे ज्ञानही असावे.
वयोमर्यादा किती असावी?
या भरती मोहिमेसाठी अर्ज करणार्या उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षे दरम्यान असावे. तर सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
पगाराचे तपशील
या भरती अंतर्गत, कनिष्ठ व्यवस्थापक पदांवरील निवडलेल्या उमेदवारांना वार्षिक 5 लाख रुपयांपर्यंत वेतन दिले जाईल. वरिष्ठ अधिकारी पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना 4 लाख रुपयांपर्यंत वेतन दिले जाईल आणि अधिकारी पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना वार्षिक 3 लाख रुपयांपर्यंत वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया
या भरती अंतर्गत, उमेदवारांची निवड ऑनलाइन चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. या ऑनलाइन चाचणीमध्ये 200 गुणांचे 200 प्रश्न असतील आणि उमेदवारांना हे प्रश्न सोडवण्यासाठी 120 मिनिटे दिली जातील.
अर्ज फी
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना 10 रुपये अर्ज शुल्क जमा करावे लागेल, तसेच आरक्षित श्रेणीतील उमेदवारांना 300 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
इतर महत्वाच्या बातम्या