BPCL Recruitment 2022 : पदवीधर शिकाऊ पदांसाठी मोठी भरती; आजच करा अर्ज, थेट मुलाखतीद्वारे नोकरी
BPCL Recruitment 2022 : वरील पदांसाठी, किमान 60 टक्के गुणांसह संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी धारण केलेले उमेदवारच अर्ज करू शकतात.
BPCL Recruitment 2022 : नोकरी शोधताय? मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (Bharat Petroleum Corporation Limited), बीपीसीएल कोची यांनी पदवीधर प्रशिक्षणार्थी पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून म्हणजेच, 27 ऑगस्ट 2022 पासून सुरू झाली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 सप्टेंबर 2022 आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार mhrdnats.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी सर्वात आधी अधिसूचना वाचावी, असा सल्ला भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडकडून देण्यात येत आहे.
पदांची संख्या : 102
शैक्षणिक पात्रता
रिक्त पदांसाठी किमान 60 टक्के गुणांसह संबंधित विषयांतील अभियांत्रिकी पदवी धारण केलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, बीपीसीएल भरीतसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 18 ते 27 वर्षांचं असावं. 1 सप्टेंबर 2022 पासून वयाची गणना केली जाईल. दुसरीकडे, राखीव प्रवर्गातील उमेदवारांनाही यामध्ये सूट देण्यात येणार आहे.
कशी केली जाणार निवड?
उमेदवारांची निवड मुलाखतीच्या माध्यमातून करण्यात येईल. उमेदवारांची निवड संबंधित पदवींमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर केली जाईल. अधिक तपशीलांसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाईटला भेट देऊन संपूर्ण तपशील तपासू शकतात.
कसा कराल अर्ज?
सर्वात आधी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट mhrdnats.gov.in वर भेट द्यावी.
होम पेजवर देण्यात आलेल्या All Notifications/Advertisements सेक्शनवर क्लिक करा.
इथे संबंधित पदांसाठी अर्ज करण्यासाठी क्लिक करा.
आता आवश्यक तपशील आणि कागदपत्रं अपलोड करा.
अर्ज फी भरा आणि सबमिट करा.
अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :